आज सोशल मीडिया आणि एआय तंत्रज्ञानाच्या काळात योग्य आणि खऱ्या बातम्यांपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. घटना कोणतीही असो सर्वात जास्त हिट्स आणि लाईक मिळवण्याच्या नादात अतिरंजीत बातम्यांचा मारा वाचकांवर केला जातो. ऑनलाईन माध्यमांच्या या काळात योग्य, मुद्देसुद आणि चांगले लेखन करणे हे मिसलेनियस मीडिया हाऊस चे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत दररोजच्या बातम्या आणि प्रासंगिक लेखांचा समावेश असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला जागतिक तसेच देशस्तरावरील महत्त्वाच्या बातम्या वाचायला मिळतील. त्याशिवाय देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर, सरकारच्या काही विशिष्ट सुविधांवरील रिपोर्ताजही असतील. तुमच्या पर्यंत चांगला वैचारिक, मनोरंजनात्मक आणि माहितीपूर्ण मजकूर घेऊन येणे हे मिसलेनियस मीडिया हाऊस या माध्यमाचे उद्दीष्ट असणार आहे. तुमच्या परिसरातील, शहरातील, गावातील काही समस्या, चांगले उपक्रम, असे काही तुम्हाला सांगायचे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. तुमच्या उपक्रमाचे, समस्यांचे फोटो, मजकूर तुम्ही पुढील ई-मेल आयडीवर पाठवू शकता. miscllaneous.mediahouse@gmail.com
Home About Us