Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Maharashtra Cabinet Decision Today Big Dicision For Dharavi Slum Big 10 Decision...

Maharashtra Cabinet Decision Today Big Dicision For Dharavi Slum Big 10 Decision : मंत्रीमंडळाचे 10 मोठे निर्णय; धारावी झोपडपट्टीधारकांसाठी मोठा निर्णय.

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रीमंडळाची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत वेगवेगळ्या विभागांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काय आहेत ते निर्णय ते आपण पाहू. 

महाराष्ट्र : 2025-06-17

राज्य मंत्रिमंडळाची आज ( 17 जून ) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारने या बैठकीत कृषी विभागाचे महाॲग्री-एआय धोरण मंजूर केले आहे. तर आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपट्टीने वाढ करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. 

राज्यमंत्रीमंडळानेे घेतलेले महत्त्वाचे निर्णय 

महसूल विभाग 

1 ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जाबुंटके येथील 29 हेक्टर 52 आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार आहे. 

2 एमएमआरडीए आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत. सार्वजनिक, खासगी भागिदारीतून हा राज्यातील पहिलाच मोठा प्रकल्प. ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षीत होणार.

3. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी (SPV) आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ. लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने, पुनर्वसन व पुनर्वसन योजनेला गती लाभणार. योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार. 

4. कृषी विभाग 

केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची (AWS-Automatic Wather Station ) उभारणी करण्यात येणार. यासाठी महावेध प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय. राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प. शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्त्वाचा प्रकल्प. 

6. महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धीमत्ता महाॲग्री-एआय (MAhaAgri-AI) धोरण 2025-2029 मंजूर. कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पुर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत, राज्यातील ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसाऱखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार आहे. 

7. नगरविकास विभाग – मुंबई मेट्रो मार्ग 2-अ, 2 -ब, आणि 7 या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यु डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ. 

8. सार्वजनिक बांधकाम विभाग – विरार-अलिबाग बहुद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता, ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा” या तत्त्वावर हाती घेण्यास मान्यता. 

9. सामान्य प्रशासन विभाग – आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ. हयात जोडीदारालाही मानधन मिळणार आहे. गौरव योजनेमध्ये सुधारणा. 

10. उच्च व तंत्रशिक्षण विभाग – अनिवासी भारतीयांच्या मुलांना, पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार. विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल. प्रवेश व शुल्क यांचे विनियम अधिनियम, 2015 मध्ये सुधारणा. 

 

 

 

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

Pune Metro News, Good News, 2025: पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी : Modi Government Aprrove...

Pune Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. पुणे :...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments