Saturday, June 27, 2026
Home राष्ट्रीय Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द,...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000 Flights Cancelled In Six Days Chaos At Delhi Airport

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये दिल्ली, चेन्नई, जयपूर, हैद्राबाद, भोपाळ, मुंबई आणि त्रिची येथून निघणाऱ्या विमानांचा समावेश आहे.

दिल्ली : 07/12/2025

इंडिगोच्या उड्डाणांचा विलंब आणि घोळ सध्या सुरूच आहे. या सगळ्या गोंधळामध्ये सलग सहाव्या दिवशी भरच पडली आहे. रविवारी (7 डिसेंबर) दिल्ली विमानतळावर इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लांब रांगा लागल्या होत्या. उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पहावी लागली. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, दिल्ली विमानतळावरील उड्डाण माहिती स्क्रीनवर इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाल्याचे वृत्त दिले आहे.

यात भर म्हणून चेन्नई विमानतळावरही 30 हून अधिक उड्डाणे रद्द कऱण्यात आली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही इंडिगोच्या अनेक प्रवाशांना उड्डाणे रद्द कऱण्यात आली. विलंबाचा सामना करावा लागला. गेल्या पाच दिवसांत इंडिगोच्या 2000 हून अधिक उड्डाणे रद्द कऱण्यात आली. ज्यामुळे दिल्ली, बंगळूर आणि हैद्राबाद सारख्या प्रमुख केंद्रावरही त्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले.

शनिवारी 800 विमान उड्डाणे रद्द  (Indigo Flights Issues)

इंडिगोने शनिवारी एक निवेदन जारी करत, 800 हून अधिक उड्डाणे रद्द केली. तर शुक्रवारी 1,000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. विमान कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये सतत वाढत असलेल्या गोंधळामुळे प्रवाशांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

केंद्र सरकारकडून विमानांच्या तिकिटांवर लगाम  (Indigo Flights Issues)

या संकटादरम्यान, सरकारने विमान भाडे निंयत्रित करण्याचा आदेश जारी केला. नागरी उड्डाणे मंत्रायलायच्या म्हणण्यानुसार, 500 किलोमीटरपर्यंत विमानांसाठी कमाल भाडे 7,500,500 ls 1,000 किलोमीटरच्या विमानांसाठी 12,000, 1,ooo ते 1,500 किलोमीटरच्या विमानांसाठी 15, 000 आणि 1,500 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या विमानांसाठी 18,000 असे निश्चित करण्यात आले आहे. हे नियम बिझनेस क्लास आणि उडान योजनेच्या विमानांना लागू होणार नाहीत.

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगो संकटामुळे शनिवार 800 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यानंतर आज 6 व्या दिवशीही इंडिोगोच्या सहाव्या दिवशीही सुरू आहे. तथापि, इंडिओने त्यांच्या 95 टक्के उड्डाणे सामान्य केल्याचा दावा केला आहे.

138 पैकी 135 ठिकाणी विमानसेवा सुरू असल्याचे एअरलाईनने सांगितले. सध्या इंडिगो कंपनीविषयीची प्रवाशांच्या मनातील विश्वासार्हता कमी झाली आहे. ती परत पूर्ववत होण्यासाठी किती दिवस लागणार हे निश्चित नाही.

RELATED NEWS

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Goa Arpora Fire, Shocking News : गोव्यातील आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त, मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत : PM Narendra...

Goa Arpora Fire : गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये आगीची घटना घडली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करून मृतांच्या वारसांना मदत...

Parliament Winter Session, Big News 2025 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गोंधळ, विरोधकांकडून ‘व्होट चोर गद्दी छोड’चा नारा : Chaos Continues In Parliament...

Parliament Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान दुसऱ्या दिवशीही गोंधळ झाला. चर्चेदरम्यान एसआयआर हा शब्द टाळून "निवडणूक सुधारणा" किंवा इतर नावाने हा विषय कामकाजात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments