Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Big Announcement , Sanjay Raut : शेतकऱ्यांसाठी ठाकरे रस्त्यावर उतरणार ! भव्य...

Big Announcement , Sanjay Raut : शेतकऱ्यांसाठी ठाकरे रस्त्यावर उतरणार ! भव्य मोर्चा काढणार, राऊतांचा इशारा : Grand Morche Will Be Held In Marathwada In October says Sanjay Raut .

Sanjay Raut : सध्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभिर झाली आहे. याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी मोठ्या मोर्चाचे सुतोवाच केले आहे. काय म्हणाले राऊत जाणून घ्या.

मुंबई : 26/09/2025 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच मराठवाडा दौरा केला, खासदार संजय राऊत त्यांच्यासोबत यावेळी होते. शेतकऱ्यांना त्यांनी यावेळी भेट दिली.शेतकऱ्यांचे अश्रू पुसत त्यांना धीर दिला. मराठवाड्यातील परिस्थितवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसल्याते सांगत त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली. मतदारसंघ पाण्यात बुडालेला असताना तिथे न थांबता, पुण्यात गेलेल्या तानाजी सावंत यांच्यावर (Sanjay Raut)  राऊतांनी टीकास्र सोडले.

पीएम केअर फंडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची मागणी आहे. दिवाळीच्या आधी जनतेला, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर जनतेसाठी जनतेबरोबर रस्त्यावर उतरू असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात भव्य मोरर्चा काढण्यात येईल, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 11 ऑक्टोबरला शिवसेना प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील असे राऊत म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा हा भव्य मोर्चा असेल. यापूर्वी 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात शिबीर होणार होतं. मात्र या परिस्थीतीत ते शिबीर घेणं शक्य नाही. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्याचे रूपांतर मोर्चात व्हावं आणि आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडाव्यात असे आता ठरले आहे. या मोर्च्याचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे करणार आहे.

सरकार असंवेदनशील- संजय राऊत (Sanjay Raut)

सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासनही त्यापेक्षा असंवेदनशील आहे, प्रशासनावर कोणताही धाक नाही. धाराशिवमध्ये पाऊस, पुरामुळे शेतकरी रडत असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यावरूनच राऊतांनी असे विधान केले आहे. सरकारने आम्हाला तुटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत की, मदत आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. ते आमचा छळ करतील अशी शेतकऱ्यांनी भूमिका असल्याचे राऊत म्हणाले.

अनेक निकष लाऊन, आमच्यापर्यंत मदत पोहोचणार नाही याची ते काळजी घेतील, त्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे अधिकारी आहेत, जे नाचतात, बागडतात. लोकं तिथे पाण्यात आहेत. उपाशी आहेत. काही वाहून गेले आहेत. आणि हे इथे नाचत आहेत, अशा असंवेदनशील अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा सवाल राऊतांनी विचारला .

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

Pune Metro News, Good News, 2025: पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी : Modi Government Aprrove...

Pune Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. पुणे :...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments