Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Cabinet Decision 2025: मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 5 निर्णय, शेतकऱ्यांसाठीही निर्णय :...

Cabinet Decision 2025: मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 5 निर्णय, शेतकऱ्यांसाठीही निर्णय : Maharashtra State Cabinet Meeting Government Taken Five Big Decesions One Decision For Farmer.

Cabinet Decision 2025 : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एका निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊ काय आहेत निर्णय ?

मुंबई : 30/09/2025

राज्य मंत्रिमंडळाची आज (30 सप्टेंबर) सप्टेंबर महिन्याची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यातील विधी सेवा, वैद्यकीय शिक्षण, औषध, उर्जा क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेण्यात आले आहेत. यातील एका निर्णयामुळे आता शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देण्यासाठी कृषीपंपाला वीज मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे राज्याच्या उद्योग विभागाअंतर्गत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग (Cabinet Decision 2025 )

कर्करोग रोग उपचारासाठी सर्वसमावेशक असे धोरण निश्चित कऱण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांना कर्करोग रोगासंदर्भात दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होणार आहे. त्रिस्तरीय सम्रग कर्करोग उपचार सेवा निश्चित करण्यात आली आहे. राज्यभरातील 18 रूग्ण्यालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होणार आहेत. यात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च ॲंड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन- MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापना केली जाणार आहे. कंपनीच्या भागभांडवलासाठी शंभर कोटींचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे.

उद्योग विभाग  ( Cabinet Decision 2025 )

महाराष्ट्राचे जागतिक क्षमता केंद्र (ग्लोबल कॅपॅब्लिची सेंटर – GCC ) धोरण 2025 मंजूर करण्यात आले आहे. यामुळे विकसित भारत 2047 च्या वाटचालीस सुसंगत अशी वाटचाल व्हावी यासाठी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय सहकार्य या गोष्टींना प्रोत्साहन मिळणार आहे.

उर्जा विभाग ( Cabinet Decision 2025 )

औद्योगिक, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंजुरी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक-ब व अन्य योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्याकरिता निधी उपलब्ध होणार आहे.

नियोजन विभाग ( Cabinet Decision 2025 )

महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी देण्याचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध क्षेत्रात धोरणात्मक नियोजन करण्यास आणि निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

विधि व न्याय विभाग ( Cabinet Decision 2025 )

सातारा जिल्ह्यात फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन कऱण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या न्यायालयासाठी आवश्यक पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे.

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

Pune Metro News, Good News, 2025: पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी : Modi Government Aprrove...

Pune Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. पुणे :...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments