Saturday, June 27, 2026
Home प्रासंगिक लेख Dr. Jayant Naralikar Biography : थोर शास्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचे जीवनचरित्र (1938...

Dr. Jayant Naralikar Biography : थोर शास्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचे जीवनचरित्र (1938 – 2025 )

शास्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर ( Dr. Jayant Naralikar )यांचे 20 मे 2025 रोजी, वयाच्या 86 वर्षी पुण्यात निधन झाले. ते फक्त खगोलशास्रज्ञ नव्हते, तर ते त्यांच्या साहित्यासाठीही तेव्हढेच ओळखले जात. त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीवर नजर टाकणारा हा लेख. 

जयंत नारळीकरांचे बालपण, कुटुंब आणि शिक्षण 

डॉ. जयंत विष्णू नारळीकर ( Dr. Jayant Naralikar ) यांचा जन्म 19 जुलै 1938 ला कोल्हापूर येथे झाला. त्यांचे आई-वडील दोघेही उच्चविद्याविभूषीत होते. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासूदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ होते. तर त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. डॉ. नारळीकरांते शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. पुढे त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली. या परिक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांनी बीए, एमए आणि पिएचडीच्या पदव्या मिळवल्या. 

कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे – 

  • 1959 – गणितात बीए पदवी प्राप्त
  • 1960 – खगोलशास्रासाठी टयसन पदक जिंकले
  • 1962 – केंब्रिजमध्ये डॉक्टरेटच्या अभ्यासादरम्यान त्यांना स्मिथ पुरस्काराने सन्मानित 
  • 1963 – फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएडी पदवी प्राप्त.
  • 1964 – खगोलशास्र आणि खगोल भौतिकशास्रात पदव्युत्तर पदवी मिळाली
  • 1972 – भारतात परत आल्यावर मुंबई येथे टाटा इन्सिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये प्राध्यापकपद स्विकारले. 

जयंत नारळीकर यांचे संशोधन 

डॉ. जयंत नारळीकर ( Dr. Jayant Naralikar ) यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी मांडली. त्यांनी यांच्यासोबत कन्फॉर्मल गुरुत्वाकर्षण सिद्धांत विकसित केला, ज्याला होयल-नारळीकर सिद्धांत म्हणून ओळखले जाते. जे अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचे आणि माकच्या तत्त्वाचे संश्लेषण करते. हा सिद्धांत असे प्रस्तावित करतो की, कणाचे जडत्वीय वस्तुमान हे इतर सर्व कणांच्या वस्तुमानांचे कार्य आहे,ज्याला जोडणी स्थिरांकाने गुणाकार केले जाते. जे वैश्विक युगाचे कार्य आहे. 

स्टेडी स्टेट विश्वसिद्धांत : या सिद्धांतावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. जो बिग बँग सिद्धांताला पर्यांय म्हणून मांडला आहे. यातून धुूमकेतूच्या प्रवासाची आणि पृथ्वीवर होणाऱ्या परिणामाची कल्पना मांडली आहे. 

चार दशकाहून अधिककाळ त्यांनी खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन केले होते. त्यासह त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. 

नारळीकरांना ( Dr. Jayant Naralikar ) यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट मिळाली. 2004 ला त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. 

त्यांना मिळेलेले महत्त्वाचे पुरस्कार

  • पद्मविभूषण (2004 )
  • पद्मभूषण (1965 )
  • महाराष्ट्र भूषण (2010 )
  • साहित्य अकादमी पुरस्कार (2014)
  • स्मिथ पुरस्कार ( 1962 )
  • ॲडम्स पारितेषिक (1967)
  • कलिंग पुरस्कार ( 1996)
  • प्रिक्स ज्युल्स जॅन्सेन ( 2004 ) 

जयंत नारळीकरांनी संशोधनासह विपूल लेखन केले. 2021 मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

जयंत नारळीकरांची साहित्य संपदा –

  • अंतराळातील भस्मासुर
  • अंतराळातील स्फोट
  • अभयारण्य 
  • चला जाऊ अवकाश सफरीला
  • टाईम मशीनचा किमया
  • प्रेषित
  • यक्षांची देणगी
  • याला जीवन ऐसे नाव
  • वामन परत न आला
  • व्हायरस 
  • अंतराळ आणि विज्ञान 
  • आकाशाशी जडले नाते
  • गणितातील गंमतीजंमती
  • नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान 
  • Facts And Speculations In Cosmology ( सहलेखक Geoffrey Burbidge )
  • युगायुगाची जुगलबंदी गणित अन विज्ञानाची 
  • विश्वाची रचना
  • विज्ञान आणि वैज्ञानिक 
  • विज्ञानगंगेची अवखळ वळणे
  • विज्ञानाची गरूडझेप
  • विज्ञानाची रचियते
  • समग्र जयंत नारळीकर 
  • सेव्हन वन्डर्स ऑफ कॉसमॉस
  • सूर्याचा प्रकोप 
RELATED NEWS

Navaratra Colour Theme Secret ; 2025 : नवरात्रात वापरण्यात येणाऱ्या ‘कलरकोड’ मागचं शास्र माहीत आहे ? जाणून घ्या कधी सुरू झाली ही प्रथा.

Navaratra Colour Theme Secret : गेल्या काही वर्षांपासून नवरात्र उत्सवादरम्यान एक नवीन प्रथा डोकावू लागली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांना नऊ वेगवेगळ्या रंगात वाटून घेण्यात...

The Hunt : The Rajiv Gandhi Assassination Case, 90 days Journey, The Numbing Experience ! : द हंट, द राजीव गांधी असॅसिएशन केस, 90...

The Hunt : The Rajiv Gandhi Assassination Case :  नुकतीच सोनी लाईव्ह प्लॅटफॉर्मवर एक वेबसिरीज रिलिज झाली आहे. एक सुन्न अनुभव देणारी अशी ही...

जागतिक बॅडमिंटन दिवस ; सुरूवात 2023 , इतिहास आणि महत्त्व : World Badmiton Day ; Start 2023 ; History And Importance. .

World Badminton Day 2025 : आज 5 जुलै या दिवशी संपूर्ण जगात बॅडमिंटन दिवस म्हणून साजरा केला जातो. कधी सुरू झाला जागतिक बॅडमिंटन दिवस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments