Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Coldrif Cough Syrup Ban : राजस्थान , मध्यप्रदेशात 18 मुलांच्या बळीनंतर,...

Coldrif Cough Syrup Ban : राजस्थान , मध्यप्रदेशात 18 मुलांच्या बळीनंतर, महाराष्ट्रातही औषधावर बंदी. : Toxic Coldrif Cough syrup Banned In Maharashtra After 18 Child Deaths

Coldrif Cough Syrup Ban :राजस्थानमध्ये कोल्ड्रीफ कफ सिरपमुळे 18 बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात मोठी खळबळ माजली. आता महाराष्ट्रातही या औषधावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई : 06/10/2025 

राजस्थानमधील 18 बालकांचा कोल्ड्रीफ कफ सिरपमुळे मृत्यू झाल्यानंतर, महाराष्ट्रात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्ड्रिफ कफ सिरपवर (Coldrif Cough Syrup Ban) महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून, या औषधाची विक्री, उत्पादन आणि वितरण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपच्या सेवनामुळे 18 बालकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्ड्रिफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक आढळून आला आहे, जो वाहनांच्या ब्रेक ऑईलमध्ये वापरला जातो. या घटकामुळे बालकांची किडनी निकामी होऊन त्यांचे प्राण गेले.

राज्य शासनाने लागू केलाय टोल फ्रि क्रमांक (Coldrif Cough Syrup Ban)

राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने याबाबत एक टोल फ्रि क्रमांक (1800 222 365 ) लागू केला आहे. मेडिकल दुकानांमध्ये एप्रिल 2017 ते मे 2025 या कालावधीमधील कोल्ड्रिफ सिरपचा साठा आढळ्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, औषध निरिक्षकांना असा साठा गोठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाचाही निर्णय (Coldrif Cough Syrup Ban)

केंद्र सरकारनेही या घटनेनंतर सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावून बालकांना खोकल्याची औषधे सावधगिरीने देण्याचे निर्देश दिले आहेत. दोन वर्षांखालील मुलांना खोकल्याचे औषध अजिबात न देण्याचा आणि पाच वर्षांंखालील मुलांना डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय औषध न देण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

राजस्थानमधील घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, लहान मुलांच्याबाबतीत अधिक सावधानतेने औषधांची निवड करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

Pune Metro News, Good News, 2025: पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी : Modi Government Aprrove...

Pune Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. पुणे :...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments