Saturday, June 27, 2026
Home पुणे Parth Pawar, Breaking News : पार्थ पवारांच्या कंपनीकडून जमीन घोटाळा केल्याचा आरोप...

Parth Pawar, Breaking News : पार्थ पवारांच्या कंपनीकडून जमीन घोटाळा केल्याचा आरोप होतोय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

Parth Pawar : अजित पवार पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनी अमेडिया संबंधित एक आर्थिक व्यवहार घोटाळा प्रकरण समोर आला आहे. या प्रकरणामुळे पुणे तहसीलदार सूर्यकांच येवले यांना निलंबित करण्यात आले आहे.

पुणे : 06/11/2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Parth Pawar) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनी अमेडिया संबंधित एक आर्थिक व्यवहार घोटाळा प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे.

काय आहे हे प्रकरण ? (Parth Pawar)

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची कंपनीसंबंधित ही माहिती समोर आली आहे. पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटी रूपयांत विकलेल्या प्रकरणाची माहिती समोर आली आहे. या जमीन व्यवहारात गैरप्रकार झाले असून केवळ 500 रूपयांच्या स्टँपड्यूटीवर हा व्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हे प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील लावून धरले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया (Parth Pawar)

पार्थ पवारांबाबत समोर आलेल्या या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, अद्याप माझ्याकडे संंपूर्ण प्रकरणाची माहिती आलेली नाही. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर आले आहेत ते मात्र गंभीर आहेत. त्यामुळे योग्य माहिती घेऊन बोलले. संपूर्ण माहिती बाहेर आल्यानंतर शासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, सदर प्रकरणाबाबत मी सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लॅन्ड रेकॉर्ड याची सर्व माहिती मागवली आहे. योग्य ते चौकशीचे आदेशही मी दिलेले आहे. सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी प्रतिक्रीया देईल, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री फडणवीसांनी देत आपली नाराजी व्यक्त केली.

यानंतर पुण्यातील संबंधित तहसिलदारांवर कारवाई करण्यात आली आहे. पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तत्पूर्वी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

RELATED NEWS

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against...

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत आणि इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर मोर्चा...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments