Saturday, June 27, 2026
Home पुणे Parth Pawar Pune Land scam Sheetal Tejawani : पुणे जमीन घोटाळ्याची मास्टरमाईंड...

Parth Pawar Pune Land scam Sheetal Tejawani : पुणे जमीन घोटाळ्याची मास्टरमाईंड शीतल तेजवानी फरार ? पोलिसांकडून शोध सुरू

parth Pawar Pune Land scam Sheetal Tejawani : राज्यभर सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पुण्यातील जमीन घोटाळा. ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव अडकले आहे. याशिवाय या घोटाळ्याची मास्टरमाईंड शीतल तेजवानी ही फरार असल्याचे बोललो जात आहे. जाणून घेऊ याविषयीची संपूर्ण माहीती.

पुणे : 09/11/2025

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर भूखंड घोटाळा प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पार्थ पवार आणि भागिदार असलेल्या दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनी मार्फत हा जमीन व्यवहार करण्यात आला होता. पण यात गंभीर गैरव्यवहार आणि शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यात राजकारण तापलं असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे.

शीतल तेजवीनी फरार ? (Parth Pawar Pune Land scam Sheetal Tejawani )

पार्थ पवार यांच्याशी या जमिनीचा व्यवहार करणारी शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहीती समोर आली आहे. कोरेगाव पार्क आणि बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची मास्टरमाईंड असलेली शीतल तेजवानीविरूद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिचा फोनही बंद असून ती राहत्या पत्त्यावरही आढळून आलेली नाही. शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने बावधन पोलीसांनी विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे.

कोण आहे ही शीतल तेजवानी ? (Parth Pawar Pune Land scam Sheetal Tejawani)

शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे दांपत्या सेवा विकास बँकेतील तब्बल 60 कोटी रूपयांच्या कर्ज घोटाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. सागर सूर्यवंशी (पूर्वीचे तेजवानी) यांनी पत्नी शीतल तेजवानी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे एकुण 41 कोटी रूपयांची 10 कर्जे घेतली. या सर्व कर्जांसाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. ही कर्जे सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शाखांमधून उचलण्यात आली.

कर्ज घेण्याचे कारण दाखवून देण्यात आलेल्या व्यवसायांमध्ये ती रक्कम वापरली न जाता इतर वैयक्तीक आणि व्यावसायिक कामकाजात खर्च करण्यात आली. या संदर्भातील प्राथमिक ऑडिट 2019 मध्ये सहकार सह आयुक्त राजेश जाधवर यांनी केल्यानंतर हा गैरव्यवहार उघडकीस आला. सागर आणि शीतल यांनी घेतलेली कर्जे मुद्दाम न फेडल्यामुळे 31 मार्च 2021 पर्यंत ही रक्कम 60 कोटी रूपयांवर पोहोचली.

त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये ईडीने सागर सूर्यवंशीच्या घरी व कार्यालयावर छापे टाकले. मे 2023 मध्ये हे प्रकरण स्पेशल कोर्टात दाखल करण्यात आले. सागर सूर्यवंशीच्या 45 कोटी रूपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात ऑक्टोबर 2021 मध्ये प्रथम सीआयडीने आणि नंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सागर सूर्यवंशीला अटक केली होती. जामिनावर सूटताच, जून 2023 मध्ये ईडीने पुन्हा त्याला अटक केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीवर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. सुमारे 1804 कोटी रूपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटींना खरेदी केल्याचा गंभीर आरोप कऱण्यात आला आहे. या व्यवराहानंतर केवळ दोन दिवसांतच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. नियमानुसार या खरेदीवर सुमारे 21 कोटी रूपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागले असताना, फक्त 500 रूपयांवर व्यवहार पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. विरोधकांनी या प्रकऱणावर टिकेची झोड उठवत सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.

RELATED NEWS

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against...

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत आणि इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर मोर्चा...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments