Saturday, June 27, 2026
Home पुणे Pune Land Scam, Shocking, 2025 : पार्थ पवारांच्या कंपनीसाठी काय काय करण्यात...

Pune Land Scam, Shocking, 2025 : पार्थ पवारांच्या कंपनीसाठी काय काय करण्यात आले ? तहसीलदार येवलेंचे कारनामे, जाणून घ्या संपूर्ण बातमी.

Pune Land Scam : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने मुंढवा येथील 17.51 हेक्टर (सुमारे 44 एकर) जमीन बेकायदा विकत घेतल्याचा आरोप आहे. या प्रकऱणात कोणी कोणी काय काय केले याची माहीती जाणून घेऊ.

पुणे : 09/11/2025

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्ख पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीने (Pune Land Scam)  तब्बल 1,804 कोटी रूपये बाजारभाव असलेली जमीन केवळ केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याता गंभीर आरोप होत आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सर्वत्र योग्य कारवाईची मागणी होत आहे.

या जमीन व्यवहाराशी संबंधित निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी मुंढवा परिसरातील ही जमीन अमेडिया होल्डिंंग्स कंपनीला मिळवून देण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करण्यात आले होते. याविषयीचे पुरावे एका वृत्तवाहिनीला मिळाले होते.

सदर जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून, तपास यंत्रणा या प्रकरण संबंधित कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. या प्रकरणात आणखी काही नवे धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर (Pune Land Scam)

पुण्यातील वादग्रस्त जमीन प्रकणातील (Pune Land Scam)  धक्कादायक बाब म्हणजे. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनीच ही जमीन अमेडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीला मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध हलचाली केल्याचे दस्तऐवजी पुरावे समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार येवले यांनी सर्वप्रथम जून महिन्यात बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेला पत्र लिहून ही जमीन मुळ महार वतनदारांची असल्याचा दावा केला. वतनदार भोगवटा भरण्यास तयार असल्याने त्यांना ती जमीन परत देण्यात येत असल्याचे नमूद करत, संस्थेला ती जागा तत्काळ रिकामी करण्याचे निर्देश दिले होते.

यानंतर, जुलै महिन्यात त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात दुसरं पत्र पाठवून, संबंधित जमीन वतनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. वतनदारांनी पॉवर ऑफ ॲटर्नी शीतल तेजवानी यांच्या नावावर असल्याने आणि त्यांनीच ती जमीन तब्बल 300 कोटी रूपयांना पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज कंपनीला विकल्याने, अखेर ही जमीन अमेडिया कंपनीकडे जाण्यासाठी प्रशासनिक हालचाली वेगाने सुरू झाल्या.

तहसीलदार येवलेची महत्त्वपूर्ण भूमिका (Pune Land Scam)

या संपूर्ण व्यवहारात तहसीलदार येवले यांच्या सक्रिय भूमिकेमुळे, त्यांना हाताशी धरून जमीन हस्तांतरणाचा प्रयत्न गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. येवले यांनी बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाला पाठवलेली दोन्ही पत्रे आता समोर आली असून, तीच या घोटाळ्यातील महत्त्वाचे पुरावे ठरत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीने मुंढवा येथील 17.51 हेक्टर (सुमारे 44 एकर ) जमीन बेकायदा विकत घेतल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात 7 नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोणी केली तक्रार दाखल (Pune Land Scam)

हा एफआयआर पुणे शहराचे नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांनी दाखल केला आहे. तक्रारीनुसार, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी 9 जून 2025 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक संचालकांना पत्र लिहून, संबंधित जमीन रिकामी करून ती अमेडिया कंपनीला देण्यासाठी हालचाल सुरू केली होती. मात्र, येवले यांनी हे पत्र कोणत्या विभागाला पाठवले होते. याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आलेला नाही.

एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, ” या पत्राद्वारे येवले यांनी आपले अधिकार बेकायदा पद्धतीने वापरल्याचे दिसते.” या कारवाईमुळे सरकारी मालकीची असलेली जमीन खासगी कंपनीला देण्याचा गंभीर आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे, ही 44 एकर जमीन सध्या केंद्र सरकारच्या भारतीय वनस्पती सर्वेक्षण (Botanical Survey Of Indai-BSI) या संस्थेला भाडेतत्वावर देण्यात आली आहे. बीएसआयच्या कार्यालयात काही महिन्यांपूर्वीच ही जमीन रिकामी करण्याचे आदेश दिले होते.

RELATED NEWS

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against...

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत आणि इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर मोर्चा...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments