Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Sharad Pawar Bihar Result, Shocking Statement : आम्हीही महाराष्ट्रात भोगलयं... ...

Sharad Pawar Bihar Result, Shocking Statement : आम्हीही महाराष्ट्रात भोगलयं… शरद पवारांनी व्यक्त केल्या बिहार निवडणुक निकालाबाबत भावना

Sharad Pawar Bihar Election Result : बिहार विधानसभा निवडुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणुक आयोगावर टीका केली आहे. त्यांनी बिहार निवडणूकीआधी महिलांना वाटलेल्या 10 हजार रूपयांच्या योजनेबाबत बोलताना निवडणूक सिस्टिम करप्ट मार्गावर नेत आहे असे म्हटले आहे.

मुंबई : 15/11/2025

बिहार विधानसभा निवडणूक 2025 (Sharad pawar Bihar Election Result) निकालानंतर विरोधकांसह सर्वानाच धक्का बसला आहे. बिहारमध्ये भाजप-जनता दल ( संयुक्त ) या महायुतीने महाआघाडीचा धुव्वा उडवला. भाजपा या निवडणुकीत बिग ब्रदर ठरला आहे. तर जेडीयू दुसरी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रीया येताना दिसत आहे. दरम्यान, ज्येष्ठ राजकारणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक सिस्टीम करप्ट मार्गावर नेत आहे असे म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले…(Sharad pawar Bihar Result)

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, पैसा वाटप केल्यानंतरही निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतली. ” निवडणूकीपूर्वी 10 हजार रूपये वाटप करणं हे एक प्रकारचं करप्शन आहे. आणि ते सरकारने केलं आहे. महाराष्ट्रातही तेच झालं आहे. त्याचे परिणाम आम्ही भोगले आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकापूर्वी पैशाचं वाटप केलं होतं. आम्ही अजून काही ठरवलं नाही. कालच निकाल आला आहे.

पण ही गोष्ट आम्ही डोळे झाक करणार नाही. काही दिवसांत संसदेचं अधिवेशन सुरू होईल. तेव्हा विरोधकांची मिटिंग आम्ही बोलावू. त्यात आम्ही याबाबतचा विचार करू. ही सोपी गोष्टी नाहीये. सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते अधिकाराचा वापर पैसे वाटप करत आहेत. निवडणूक सिस्टिम करप्ट मार्गावर नेत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. आम्ही यावर चर्चा करून काही तरी करू. पैसे वाटप केल्यानंतरही निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतली. याचा आनंद ज्याला लाभ झाला असेल त्याला होणारचठ. असे शरद पवार म्हणाले.

शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत  (Sharad pawar Bihar Result)

शिवसेना निवडणूक चिन्हाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, हा शिवसनेवर अन्याय आहे. त्यांना त्याची झळ बसत आहे. दोन तीन दिवसांचं हिअरींग आहे. तिसऱ्यांदा पुढे ढकललं. ज्युडिशिअरीवर आपण बोलू शकत नाही. पण जे दिसतं ते योग्य नाही. पिपाणी चिन्ह हटवल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो.

युतीबाबत काय म्हणाले पवार ? (Sharad pawar Bihar  Result)

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करणार का यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ” राज्यात पंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका येतील. पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या जातात. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही निर्णय घेतला की तालुका आणि जिल्ह्यात पक्षाचे सहकारी आहेत त्यांनी निवडणुकीबाबतचा निर्णय घ्यावा.

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

TET Exam Update, Big News : TET परीक्षेच्या शिक्षक संघटना आक्रमक, 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा : Teachers Union Aggressive Against Tet Exam...

TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई : 01/12/2025 टीईटी परीक्षा...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments