Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Mukul Dev Passes Away : हिंदी चित्रपटविश्वाला धक्का; अभिनेता मुकुल देव यांचे...

Mukul Dev Passes Away : हिंदी चित्रपटविश्वाला धक्का; अभिनेता मुकुल देव यांचे निधन.

Mukul Dev Death : हिंदी चित्रपट सृष्टीतील एका गुणी आभिनेत्याचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

मुंबई : 2025-05-24

हिंदी चित्रपट सृष्टीतील हँन्डसम अभिनेता मुकुल देव (वय 54 ) ( Mukul Dev )यांचे निधन झाले. संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. सन ऑफ सरदार, आर राजकुमार आणि जय हो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केेलेल्या प्रसिद्ध आभिनेत्याने वयाच्या 54 व्या वर्षी 23 मे ला या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मागे पत्नी शिल्पा देव आणि मुलगी सिया असा परिवार आहे. 

त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण टिव्ही आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुकुल देव हे चित्रपटसृष्टीत येण्यापूर्णी पायलट होते, ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. त्यांनी कमर्शियल पायलट चे प्रशिक्षण घेतले होते. मात्र त्यांना पहिल्यापासूनच अभिनयात रस होता. यामुळेच त्यांनी अभिनयात करियर करायचा निर्णय घेतला. 

मुकुल देव ( Mukul Dev  )यांनी 1996 मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यांनी सुरूवातील टिव्ही शो मुमकिन मद्ये काम केले. त्यानंतर दुरदर्शनवरील कॉमेडी शो एक से बढकर एक मध्ये त्यांनी काम केले. या शोने त्यांना खरी ओळख मिळवून दिली होती. यानंतर कही दिया जले कही जिया आणि कहानी घर घर की अशा काही प्रसिद्ध हिंदी टिव्ही सिरियल्स मध्ये त्यांनी काम केले. 

टिव्ही इंडस्ट्रीत यश मिळवल्यानंतर त्यांनी ( Mukul Dev  ) आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. चित्रपट करियरची सुरूवात च्यांनी दस्तर या चित्रपटापासून केली. यात त्यांनी साकारलेल्या एसीपी रोहित मल्होत्रा ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्यांनी यमला पगला दिवाना, सन ऑफ सरदार, आर राजकुमार आणि जय हो अशा अनेक चित्रपटातंमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी फियर फॅक्टर इंडीया सीजन 1 चे होस्टींगसुद्धा केले आहे. अशा हरहुन्नरी कलाकाराचे अचानक निधन झाल्याने त्यांचे फॅन आणि सहकलाकारांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

TET Exam Update, Big News : TET परीक्षेच्या शिक्षक संघटना आक्रमक, 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा : Teachers Union Aggressive Against Tet Exam...

TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई : 01/12/2025 टीईटी परीक्षा...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments