Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Heavy Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पावसाचे थैमान ! पुणे जिल्ह्यात मुसळधार...

Heavy Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पावसाचे थैमान ! पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Heavy Rain In Maharashtra : यंंदा महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सुनची एंट्री झालेली आहे. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. 

महाराष्ट्र : 2025-05-26

महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain In Maharashtra )  सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे, तर रस्त्यांवरही पाणी वहात आहे. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा सातत्याने घेत आहेत. संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर रहाण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्याठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशीही ते सातत्याने संपर्कात आहेत. 

राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मि., बारामतीत 104.75 मि.मि. , इंदापूरमध्ये 63.25 मि.मि इतका पाऊस झाला आहे. बारामतीत 25 घरांची थोडी पडझड झाली आहे. पुरात अडकलेल्या काही जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. मोबाईल सेवा विस्कळित झाल्या होत्या, त्या आता पूर्ववत दुरूस्त केल्या आहेत. इंदापूरमध्ये 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे. फलटणमध्ये 163.5 मि.मि. इतका पाऊस झाला.30 नागरिक दुधेबावीगावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सोय पुरविण्यात आली आहे. 

सोलापूरमध्ये 67.75 मि.मि. पाऊस झाला, माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले त्यांनाही वाचविण्याचे कार्य सुरू आहे. 

रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे. मुंबईत 24 तासांत 135.4 मि.मि इतक्या पावसाची नोंद केली आहे. 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. तर 5 ठिकाणी इमारतीच्या भिंती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमनदल, मुंबई पोलीस आणि इतरही यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत. मुंबईत पुढील 24 तासांत विजांच्या गडगडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ठाण्यालाही पावसाने झोडपले आहे. रात्रभर संपूर्ण जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.  

 

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

Pune Metro News, Good News, 2025: पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी : Modi Government Aprrove...

Pune Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. पुणे :...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments