Saturday, June 27, 2026
Home आरोग्य Corona Virus Thane, Maharashtra Update : ठाण्यात कोरोनाचा बळी, न घाबरण्याचे वैद्यकीय...

Corona Virus Thane, Maharashtra Update : ठाण्यात कोरोनाचा बळी, न घाबरण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन ..

Corona Virus Thane Maharashtra Update – कोरोनाने सध्या पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याचे चित्र केरळ सह महाराष्ट्रात दिसत आहे. पुणे, मुंबईत काही पेशंटला कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या असताना, ठाणे जिल्ह्यात कोवीड-19 च्या संक्रमणाने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 

ठाणे : 2025-05-27

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस पुन्हा एकदा पसरत असल्याचे वृत्त आहे. केरळ नंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना संक्रमणाच्या केसेस दाखल झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्याच्या ( Thane )  एका खासगी रूग्णालयात कोविड- 19 साठी उपचार घेत असणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेनेही (KDMC ) कोरोना व्हायरस संक्रमणनाने एक मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील हा दुसरा मृत्यू आहे. 

केडीएमसी च्या स्वास्थ्य विभागाचे प्रभारी अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी सोमवारी कोरानाबाधीताच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंबईला लागून असलेल्या राज्यातील काही भागात कोरोना विषाणू संसर्गाचे रूग्ण वाढल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रात चार जणांना कोविड- 19 ची लागण झाल्याती पुष्टी त्यांनी केली. 

डॉ.दीपा शुक्ला म्हणाल्या की, यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या एका रूग्णाला उचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तिसऱ्या बाधीत व्यक्तीवर खाजगी रूग्णालयात उपचार सूरू असून, चौथ्या व्यक्तीला उपचारासाठी कळवाच्या छत्रपति शिवाजी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. 

घाबरून जाऊ नका : डॉ.शुक्ला 

आरोग्य विभागाच्या प्रभारी अधिकारी शुक्ला यांनी सांगितले की, लोकांनी घाबरून जाऊ नका. आरोग्याविषयक खबरदारी घेऊन, नियमांचे पालन करा. आरोग्य विभागाने इतर आजारी पेशंट आणि ज्येष्ठ्य नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्कचा वापर करा अशा प्राथमिक खबरदारी घ्या असा सल्ला दिला आहे. 

विभागाने म्हटले आहे की, केडीएमसी ने कल्याणच्या बाई रूक्मीणीबाई हॉस्पिटल आणि डोंबिवलीच्या शास्री नगर हॉस्पिटल मध्ये व्हेंटिलेटर आणि विलगीकरण कक्षाची सुविधा तयार ठेवली आहे.या दोन्ही ठिकाणी कोरोना व्हायरस टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

ठाण्यात एकुण 36 केस 

ठाणे महानगरपालिकेच्या (Thane ) जनसंपर्क अधिकारी यांनी माहिती दिली आहे की, शहरात आतापर्यंत कोविड-19 च्या 36 केसेस समोर आल्या आहेत. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की, 36 रूग्णांपैकी 9 जण स्थिर स्थितीत असून हॉस्पिटल मध्ये भर्ती आहेत. उरलेल्यांना घरी आयसोलेशन मध्ये ठेवले आहे. 

 

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

TET Exam Update, Big News : TET परीक्षेच्या शिक्षक संघटना आक्रमक, 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा : Teachers Union Aggressive Against Tet Exam...

TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई : 01/12/2025 टीईटी परीक्षा...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments