Saturday, June 27, 2026
Home क्रीडा RCB Celebrations Continued At Chinnaswamy Stadium : लोकं मेले.. पण सेलिब्रेशन थांबले...

RCB Celebrations Continued At Chinnaswamy Stadium : लोकं मेले.. पण सेलिब्रेशन थांबले नाही… 8 लोकांच्या मृत्यूनंतरही चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये RCB चे सेलिब्रेशन..

आयपीएल मधील आरसीबीच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आलेल्या 8 फॅन्सचा मृत्यू झाला. मात्र तरीही चिन्नास्वामी स्टेडीयम ( Chinnaswamy Stadium ) येथील RCB सेलिब्रेशन थांबले नाही. 

बंगळूरू : 2025-06-04

यंदाच्या आयपीएल 2025 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्सने बाजी मारत काल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या यशाचा आनंद साजरा कऱण्यासाठी आणि खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी आज बंगळूरू मधील एम. चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये ( Chinnaswamy Stadium )कार्यक्रम होता. मात्र RCB च्या फॅन्सनी येथे इतकी गर्दी केली, की त्याठिकाणी चेंगराचेंगरी झाली, या घटनेत एकुण 8 जणांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले आहेत. मात्र तरीही स्टेडियममधील सेलिब्रेशन थांबवले गेले नाही. 

आरसीबीचे यश साजरे करण्यासाठी हजारोच्या संख्येने लोंक स्टेडीयम बाहेर उभे होते. एम चिन्नास्वामी स्टेडीयम 50 हजार प्रेक्षकांना सामावून घेते. म्हणजेच यापेक्षाही जास्त संख्येने लोकं तेथे हजर होते. अनेक लोकं स्टेडियम बाहेरून आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. सोशल मीडियावरील अनेक व्हिडियोंमध्ये दिसून येत आहे की, अनेकजण झाडांवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. 

11 जणांच्या मृत्यूनंतरही सेलिब्रेशन थांबले नाही.

आयपीएल 2025 च्या हंगामाचे विजेतेपद मिळवल्यानंतर एम. चिन्नास्वामी स्टेडीयमच्या बाहेर होणाऱ्या विजय मिरवणूकीमध्ये सामील होण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र झालेल्या चेंगराचेंगरीत काही लोकांचा मृत्यू होऊनही आरसीबीच्या खेळाडूंचे सेलिब्रेशन थांबले नाही. खेळाडू आपल्या जिंकलेल्या ट्रॉफीसह ग्राऊंडला चक्कर मारताना दिसले. तसेच विराट कोहलीने फॅँन्सशी संवाद साधल्याचेही दिसून आले. 

आयपीएल चेअरमन काय म्हणाले ?  

एम. चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेले 8 जणांच्या मृत्यूविषयी आयपीएल च्या चेयरपर्सन चा खुलासा आला आहे. आयपीएल चेयरमन अरून धूमल यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, हा कार्यक्रम भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) किंवा आयपीएल ने आयोजित केेलेला नव्हता. हा कार्यक्रम आरसीबीने आयोजीत केला होता. 

चेंगराचेंगरीचे कारण 

18 वर्षांच्या प्रतिक्षे नंतर मिळालेल्या विजयामुळे आरसीबीच्या फॅन्समध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. आज (4जून) ला होणाऱ्या विजय मिरवूणीत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकं आले होते. त्याच दरम्यान थोडा पाऊस झाल्यामुळे, पावसा पासून वाचण्यासाठी लोकं इकडे तिकडे धावू लागले. त्यातून चेंगराचेंगरी झाली. त्यातून 11 जणांचा मृत्यू आणि काही लोकं जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

RELATED NEWS

CommonWealth games 2030, Great News : भारताला राष्ट्रकुल 2030 स्पर्धेच्या यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार का ? जाणून घ्या काय आहे माहिती : Indias...

CommonWealth games 2030 : पुढील राष्ट्रकुल स्पर्धा आता 2030 मध्ये होणार आहेत. त्या कोणत्या देशात भरवण्यात येणार याचे भवितव्य ठरणार आहे. भारत या स्पर्धेचे...

Indian Women Cricket Team , Great Meet : जगज्जेत्या महिला संघाकडून राष्ट्रपतींना स्वाक्षरी केलेली जर्सी भेट, मुर्मू यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक : President Receives Signed...

Indian Women Cricket Team : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी राष्ट्रपती भवनात आयसीसी  महिला एकदिवसीय विश्वचषक विेजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली. संघाकडून सर्व...

PM Narendra Modi, Great meet : विश्वकप विजेत्या महिला क्रिकेटपटूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट ! PM Narendra Modi Meetin with Indian Womens Team

PM Narendra Modi : आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांची भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर पंतप्रधानांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments