Saturday, June 27, 2026
Home Uncategorized Will Ladaki Bahin Yojana Stop ? Ajit Pawar Give Answer : लाडकी...

Will Ladaki Bahin Yojana Stop ? Ajit Pawar Give Answer : लाडकी बहिण योजनेविषयी अजित पवार म्हणतात …

Nationalist Congress Party Anniversary :   राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. काय म्हणाले अजित पवार ? 

पुणे : 2025-06-10

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा (Nationalist Congress Party Anniversary )कार्यक्रम पुण्यात पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केले. गेल्या काही काळापासून विरोधक राज्य सरकारची लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे विधान करत आहेत. त्यानंतर आता लाडकी बहिण योजना बंद होणार का ? यावर अजित पवारांनी उत्तर दिले आहे. काय म्हणाले उपमुख्यमंत्री ? 

लाडकी बहिण योजनेविषयी अजित पवार म्हणाले 

लाडकी बहिण योजना बंद होणार का ? या विषयावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करत आहोत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो. महिना संपल्यावर आदिती मला संपर्क साधते आणि दादा महिलांना पैसे द्या म्हणून सांगते. आम्ही तातडीने पैसे देतो’. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी चिंता करण्याची गरज नाही. 

पक्ष मोठा करायचा आहे – अजित पवार 

लाडक्या बहिण योजनेवर महत्त्वाचे विधान केल्यानंतर अजित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. त्यासाठी जास्तीतजास्त जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी लोक आपल्या पक्षात येत आहेत. मी बुलढाण्याला जात आहे. तिथे अनेकजण आपल्या पक्षात येणार आहे. प्रतापराव चिखलीकर, निशिकांत पाटील हे प्रयत्न करत आहेत. पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. त्यांमुळे लोकं आपल्याकडे येत आहेत. नवीन येणाऱ्यांचं स्वागत करू,पण जुन्या लोकांनी आमचं काय ? असा विचार करू नये. तुमचंही चांगलं होईल. ज्याच्यात नेतृत्व असेल, धमक असेल, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालता येईल, त्याला संधी दिली जाईल. 

सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या, अजित पवारांचे आदेश 

अजित पवार म्हणाले की, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 10 लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नाशिकमध्ये पाच लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीने एक कोटीचं टार्गेट आपण ठेवलं आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या. गरीब असो की डॉक्टर, इंजिनियर वकील असो. त्यांना सभासद करून घ्या. प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडा. तुम्ही लोकांशी संपर्क करा, असे आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

RELATED NEWS

Raj Thackeray, Big Stroke : ‘राज ठाकरेंनी’ दाखवला मतदार यादीतील घोळ ! कोणी कोणाला काढलंय ..? म्हणत केले प्रश्न उपस्थित : Mns...

Raj Thackeray : मनसे नेते राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments