Home महाराष्ट्र Ahilyanagar Police News , Great news 2025 : अहिल्यानगरमधील पोलीसांना मिळणार...

Ahilyanagar Police News , Great news 2025 : अहिल्यानगरमधील पोलीसांना मिळणार हक्काचे घर! सत्यजीत तांबेच्या पाठपुराव्याला आले यश : Ahilyanagar News 53 Crores Fund Raised For Police Dreams Homes

0
Ahilyanagar Police News
आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे पोलीसांना मिळणार हक्काचे घर .

Ahilyanagar Police News : आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. याचे कारण म्हणजे पोलीस ड्रीम होमसाठी 53 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  जाणून घ्या पूर्ण माहिती.

अहिल्यानगर : 09/11/2025

बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर शहरातील पोलीस विभागासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि अद्ययावत घरे मिळावीत तसेच प्रशस्त कार्यालयीन सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी 25 मे 2023 रोजी 53 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहर आणि समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी 24 तास सांभाळणाऱ्या पोलीस दलाच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसह त्यांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

पोलिसांसाठी ‘ड्रीम होम’ प्रकल्प (Ahilyanagar Police News)

या निधीतून आधुनिक पोलीस लाईन प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामध्ये सुसज्ज निवासस्थाने, प्रशस्त कार्यालय, गार्डन, पार्किंग, सुशोभीकरण, प्रशिक्षण केंद्र अशा सर्व आवश्यक सुविधा असतील. संगमनेरमध्ये पोलिसांसाठी प्रथमच अशा दर्जाचे ‘ड्रीम होम’ उभारले जाणार असून हा प्रकल्प माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याचे फलित आहे.

संगमनेरमध्ये हायटेक बसस्थानकाचा मार्ग मोकळा (Ahilyanagar Police News)

बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमेनरमध्ये अनेक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. हायटेक बसस्थानक, पंचायत समिती, प्रातं कार्यालय, तहसील कार्यालय, कवी अनंत फुंदे खुले नाट्यगृहे, भव्य क्रीडा संकुल, उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, बायपास मार्ग, हॅपी हायवे, नवीन कोर्ट, प्रवरा नदीवरील पूल, भमिगत गटारे आणि शहरातील गार्डन अशी अनेक कामे यशस्वीपण पूर्ण झाली आहेत.

संगमनेरवासीयांसाठी 24 तास स्वच्छ पाणी (Ahilyanagar Police News)

निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे संगमनेर शहराला 24 तास स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा सुरू आहे. शहराच्या विकासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या योजना माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकारातून राबवल्या गेल्या आहेत. नव्या ड्रिम होम प्रकल्पामुळे संगमनेरच्या वैभवात भर पडणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version