Home राष्ट्रीय Delhi Blast High Alert in Pune Mumbai : दिल्लीतील स्फोटानंतर संपूर्ण देशात...

Delhi Blast High Alert in Pune Mumbai : दिल्लीतील स्फोटानंतर संपूर्ण देशात टेन्शन ! पुणे-मुंबईतील हायअलर्ट ! : Pune – Mumbai On High Alert After Delhi Red Fort Bomb Blast Read Details

0
Delhi Blast Pune Mubai High Alert
दिल्लीतील स्फोटामुळे देशभरात खळबळ , पुणे-मुंबईतही हायअलर्ट

Delhi Blast High Alert in Pune Mumbai : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मुंबईसह पुण्यातही देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जाहीर केला आहे.

दिल्ली : 10/11/2025

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका पार्क केलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कारने लगेच पेट घेतला तसेच शेजारील दोन ते तीन इतर वाहनांनीही आग लागली. या आगीत तीन ते चार वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी कऱण्यात आली आहे.

दिल्लीत भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू (Delhi Blast High Alert in Pune Mumbai)

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की आसपास 200 ते 300 मीटर अंतरावर स्फोटाचा आवाज ऐकू गेला. या स्फोटात एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. काही गाड्यांचे फक्त सांगाडे उरले आहे. त्यामुळे संपूर्ण दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे -मुंबई हायअलर्ट (Delhi Blast High Alert in Pune Mumbai)

दिल्लीतील या घटनेनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुणे मुंबईतही हाय अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत. पुणे मुंबईतही हायअलर्ट जाहीर कऱण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आली आहे. देशात इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घ़डू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून हा अलर्ट जारी कऱण्यात आला आहे.

स्फोटाचे कारण शोधले जाणार, तपासाला सुरूवात झाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6:45 वाजता स्फोट झाला आहे. दिल्लीतील ही घटना समोर आल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कारमधील स्फोटानंतर आग लागली. हीच आग विझविण्याच्या प्रयत्न अग्निशमक दलाकडून केला जात आहे. दुसरीकडे बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version