Home महाराष्ट्र ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांवर मोक्का ची कारवाई होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :...

ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांवर मोक्का ची कारवाई होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : Drug Traffickers To be Booked Under MOCCA, Announces Cheif Minister Devendra Fadanavis .

0
Devendra Fadanavis

Maharashtra Drugs Traffickers : राज्यात होत असलेल्या ड्रग्स तस्करीबाबत आज विधानपरिषदेत चर्चा झाली. यावेळी विधान परिषद सदस्यांनी ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी मोठी घोषणा केली. 

मंबई : 02/07/2025

राज्यात होत असलेल्या ड्रग्सच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. या प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील ड्रग्सची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलल्याने ड्रग्स तस्करांचे धाबे चांगलेच दणाणर आहे. 

आज विधान परिषदेत राज्यात होणाऱ्या एमडी ड्रग्सच्या तस्करीवरून चर्चा झाली. या चर्चांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली. एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

परिणय फुके यांनी उपस्थित केले प्रश्न 

भाजपचे आमदार परिणय फुके यांनी याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात मेफेड्रोनची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे. ड्रग्ज विळखा पडतो आहे. आपली संख्या त्यात सर्वाधिक आहे. तस्करीचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे या सर्वांवर मोक्का लावून कारवाई करणार का ? ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे या केस फास्टट्रॅक कोर्टात घेणार का ? असा प्रश्न परिणय फुके यांनी विचारला. ड्रग्जची तस्करी थांबवण्यासाठी टास्क फोर्स केली होती त्याचे पुढे काय झाले ? असेही त्यांनी विचारले. 

त्यांच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ड्रग्स तस्करी संदर्भात मोक्का लावता येईल का ? यावर आपण या अधिवेशनात नियमावली आणत आहोत. कायद्यात आपण बदल करून ड्रग्स तस्करी करणाऱ्यांवर मोक्का लावण्यासंदर्भात कायद्यात सुधारणा करणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 

कारवाई केली जाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन  

शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनीही यावर प्रश्न केला, इतर राज्यातून देखील अंमली पदार्थांची तस्करी होते. मध्यप्रदेश, गुजरातमधून जळगाव मुक्ताई नगर येथे आणि मध्य प्रदेशच्या आणि गुजरातच्या बॉर्डवर अफू आणि गांजाची तस्करी होतेय, याकडे खडसे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले . यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बॉर्डवर काही राज्यांत भांगला परवानगी आहे. आपल्याकडे अफूला कुठेच परवानगी नाही. मुक्ताईनगर आणि इतर ठिकाणी असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल.  

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version