Home राष्ट्रीय Manipur Terrorism : मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या खात्मा, 4 UKNA दहशतवादी ठार, सैन्याकडून ऑपरेशन...

Manipur Terrorism : मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या खात्मा, 4 UKNA दहशतवादी ठार, सैन्याकडून ऑपरेशन सुरू : Four Terrorists Killed By Indian Army In Manipur

0
Manipur Terrorism
फोटो प्रातिनिधिक आहे (साभार सोशल मीडिया)

Manipur Terrorism : गुप्तचर माहितीच्या आधारे मणिपुरमध्ये कारवाई करण्यात आली. अतिरेक्यांनी लष्कराच्या पथकावर विनाकरण गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.

मणिपूर : 04/11/2025

मणिपूरमधील चुराचंदपूरपासून सुमारे 80 किलोमीटर पश्चिमेला असलेल्या खानपी गावात सोमवारी लष्कर आणि युकेएनए दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अतिरेक्यांनी लष्कराच्या पथकावर विनाकारण गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.

मणिपूरमधील चुराचंदपुर जिल्ह्यापासून सुमारे 80 किमी पश्चिमेला असलेल्या खानपी गावात सोमवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने ही कारवाई सुरू केली.

अतिरेक्यांनी लष्करावर केला गोळीबार  (Manipur Terrorism)

ऑपरेशन दरम्यान, अतिरेक्यांनी कोणत्याही चिथावणीशिवाय लष्कराच्या पथकावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. सोमवारी पहाटे झालेल्या भीषण चकमकीत युनायटेड कुकी नॅशनल आर्मी (युकेएनए) चे चार दहशतवादी मारेल गेले.

युकेएनए ही एक नॉन-एसओओ (ऑपरेशन सस्पेंशन) संघटना (Manipur Terrorism)

मारलेले अतिरेकी युनायटेड कुकी नॅशनल आर्मी (युकेएनए) चे होते, जो एक नॉन-एसओओ (ऑपरेशन सस्पेंशन) दहशतवादी गट आहे. या गटाने अलिकडच्या काळात केलेल्या हिंसक घटनांमुळे लष्कराने ही कारावाई केली. या गंभीर हिंसक कृत्यांमध्ये गावप्रमुखाची हत्या, स्थानिक रहिवाशांना धमकावणे आणि परिसरातील शांतता भंग करण्याचे सतत प्रयत्न करणे यांचा समावेश होता.

आसाम रायफल्सने काय म्हटले ? (Manipur Terrorism)

सेना आणि आसाम रायफल्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की ही यशस्वी कारवाई प्रदेशात शांतता आणि स्थिरता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची वचनबद्धता दर्शवते. यामुळे भारतीय नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे.

आतंकवाद्यांना मारलेल्या या ऑपरेशनबाबत अधिकाऱ्यांनी माहिती सांगितली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कारवाईनंतर, आजूबाजूच्या भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दल या भागात आणखी कोणतेही दहशतवादी उपस्थित नाहीत आणि सुरक्षा पूर्णपणे पूर्ववत झाली आहे याची खात्री करत आहेत. या कारवाईवरून असे दिसून येते की अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही गैर-एसओओ गटाविरूद्ध सुरक्षा दल कठोर कारवाई करतील.

मणिपुरमध्ये 2023 साली मोठी हिंसाचार सुरू होता. यामध्ये मणिपुर अक्षरशः होरपळून निघाले. या जातीच्या समुदायामध्ये असणाऱ्या या वादामुळे हिंसा पेटली होती. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मणिपुरमद्ये अंतर्गत शांतता कायम ठेवण्यास यश आलेले असताना दहशतवाद्यांच्या कुरखोडींवर सैन्याने वचक बसवला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version