Saturday, June 27, 2026
Home Uncategorized Mumbai Monsoon Update 2025, Danger Warning, Flooding Rain In Mumbai High Alert...

Mumbai Monsoon Update 2025, Danger Warning, Flooding Rain In Mumbai High Alert Issues : मुंबईत पावसाचे थैमान ; राज्यात अनेक भागात हाय अलर्ट, पोलीसांनी नागरिकांना घरातच रहाण्याचे केले आवाहन, दिला सतर्कतेचा इशारा !.

Mumbai Monsoon Update 2025 : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईततर पावसामुळे पूरसदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. मुंबई पोलीसांनी नागरिकांना घरातच रहाण्याचे आवाहन केले आहे. 

मुंबई : 25/07/2025

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जाहीर केला आहे. पश्चिमी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी मध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईमध्ये शुक्रवार (25 जुलै) सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थीती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. 

पावसामुळे वाहतुक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे विभागातील काही उपनगरीय रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. मुंबईमध्ये दिवसभरात आणखी मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) ने सकाळी साडे आठ पासून मुसळधार पावसापेक्षाही जास्त पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे  रेड अलर्ट सांगण्यात आला आहे. 

घरांतून बाहेर पडू नका – मुंबई पोलीस ( Mumbai Monsoon Update 2025 )

मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मुंबई पोलिसांनी नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आईएमडीने याआधीच मुंबई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये ऑरेंड अलर्ट जाहीर केला आहे. रायगड मध्ये शुक्रवारी रेड अलर्ट जाहीर केला आहे. गुरूवारीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होती. मात्र साधारण स्वरूपाचा पाऊस झाला. 

गेटवे ऑफ इंडियावर पोलीस तैनात  (Mumbai Monsoon Update 2025 )

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सतत कोसळत असल्याने गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ समुद्राच्या मोठ्या लाटा उसळताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांना या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना समुद्राच्या जवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

मुंबई पोलीसांनी केले आवाहन ( Mumbai Monsoon Update 2025 )

आपल्या एक्स अकाऊंटवरून  मुंबई पोलीसांनी एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क रहाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. महत्त्वाच्या कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नका. समुद्राच्या भागात जाऊ नका. सावधानीने गाडी चालवा. पोलिसांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, आमचे कर्मचारी आणि अधिकारी पूर्णपणे सावधान आहेत आणि मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. कोणतीही आपत्ती वाटली तर, कृपया 100 / 112/103 या क्रमांकांवर संपर्क करा. 

मुंबईतील वाहतूक झाली संथ (Mumbai Monsoon Update 2025 )

बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) च्या मान्सून रिपोर्टनुसार द्वीप शहरात 29.40 मिमी, पूर्वेकडील उपनगरांमध्ये 29.44 मिमी आणि पश्चिमी उपनगरांमध्ये आत्ता पर्यंत 18.88 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार कुलाबा मध्ये 22.4 मिमी आणि सांताक्रूझ वेधशाळेमध्ये 23.9 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सकाळपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे वाहनांची गती मंदावली असून, वाहतूक संथ झाली आहे. 

अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, मध्य रेल्वे नेटवर्कमुळे उपनगरीय रेल्वे  सेवा सुरळीत सुरू आहेत. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, पश्चिमी रेल्वे नेटवर्कवर काही लोकल रेल्वे 10-15 मिनीटं उशिरा धावल्या. मुंबई आणि शेजारील जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसात्या शक्यतेमुळे पोलीसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

 

RELATED NEWS

Raj Thackeray, Big Stroke : ‘राज ठाकरेंनी’ दाखवला मतदार यादीतील घोळ ! कोणी कोणाला काढलंय ..? म्हणत केले प्रश्न उपस्थित : Mns...

Raj Thackeray : मनसे नेते राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments