Saturday, June 27, 2026
Home अहिल्यानगर Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह...

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys Throat Slit Then Body Thrown Under Bridge Parents Killed Him

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून करून मृतदेह नदीत फेकल्याचे कबुल केले.

संगमनेर : 10/12/2025

अहिल्यानगर जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदाच्या आई-वडिलांनीच आपल्या तान्ह्या बाळाचा गळा घोटून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर बाळाला मुळा नदीच्या पुलाखाली फेकून दिले. ही घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात घडली. 4 डिसेंबरला मुळा नदीच्या पुलाखाली तीन महिन्याच्या बाळाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांना तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.

काय आहे या हत्येमागचे कारण ? (Ahilyanagar Crime)

4 डिसेंबर रोजी संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात मुळा नदीच्या पात्रात एका बाळाचा मृतदेह तरंगतांना दिसल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. पोलिसांनी या बाळाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि घारगाव पोलीस याप्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.

बाळाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेली कार ही जालन्याच्या भोकरदान तालुक्यातील आव्हाना येथील असल्याचे समोर आले होते. पोलीस पथक भोकरदान येथे जाऊन आरोग्य केंद्र, आशा सेविका आणि गोपनिय माहितीचे समोर आले होते. पोलिसांनी या कारच्या मालकाकडे जाऊन चौकशी केली.

त्यानंतर या बाळाच्या आई-वडिलांकडे संशयाची सुई गेली. पोलिसांनी बाळाचे वडील प्रकाश पंडित जाधव (वय 37, रा. भिवपूर, ता.भोकरदान, जि.जालना) आई कविता प्रकाश जाधव ( वय 32) तसेच गाडी चालक हरिदास गणेश राठोड (वय 32, रा.आव्हाणा, ता. भोकरदन, जि.जालना) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करत त्यांनी या बाळाची हत्या केल्याचे सांगितले. बाळाचे नाव शिवांश प्रकाश जाधव असे.

का केली माता-पित्यानी हत्या ? (Ahilyanagar Crime)

शिवांशची हत्या तिच्या आई-वडिलांनी केल्याची कबुली दिली. शिवांशला असाध्य आजार होता. त्याला अनेक डॉक्टरांना दाखवण्यात आले. परंतु बहुतेक डॉक्टरांनी हे बाळ पूर्ण बरे होणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे आजाराने ग्रस्त असलेल्या बाळाचाच गळा दाबून त्याचा खून केला गेला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात मुळा नदीच्या पुलाखाली या बाळाच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्नावस्थेत नदिच्या पुलाखाली फेकण्यात आले आणि आई-वडिल पसार झाले.

शिवांशची हत्या केल्यावर शिवांशच्या आईने , त्याचे जालना येथे ऑपरेशन झाल्याचे सांगून नातेवाईकांमध्ये अफवा पसरवली.

RELATED NEWS

Anti Corruption Bureau Pune, Crime News, : वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Pune Crime News : पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या. पुणे : 11/25/2025 पुण्यातील...

Umarati Raid, Pune Crime News, Big News : ‘उमराटी’ छाप्यानंतर आता पुणे पोलीसांचा मोर्चा शहरातील सराईत गुन्हेगारांकडे : After Umrati raid,...

Umarati Raid, Pune Crime News : नुकतीच पुणे पोलिसांनी मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेजवळील उमरटी या ठिकाणी मोठा छापा टाकत कारवाई केली. या कारवाईनंतर त्यांनी शहरातही गुन्हेगारीवर...

Ahilyanagar Leopard Attacks, Important Update : अहिल्यानगरमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शाळांचे वेळापत्रक बिघडले, शाळेत घेण्यात येणार सुरक्षिततेचे धडे : School time Changed Due To leopard...

Ahilyanagar Leopard Attacks : अहिल्यानगरमध्ये वाढलेल्या बिबट्यांचे हल्ले शाळांच्या वेळेतील बदलांसाठी कारणीभूत ठरत आहेत. येथील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अहिल्यानगर : 20/11/2025 अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments