Saturday, June 27, 2026
Home पुणे Anti Corruption Bureau Pune, Crime News, : वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस...

Anti Corruption Bureau Pune, Crime News, : वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Pune Crime News : पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.

पुणे : 11/25/2025

पुण्यातील वाघोली परिसरातील पोलीस स्टेशनमधून एक लाच प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे एक पोलीस हवालदार ही लाच घेताना पकडला गेला आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीमुळे हा हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच हा हवालदार घेत होता. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात तो अडकला.

काय आहे हे लाच प्रकरण (Anti Corruption Bureau Pune)

परमेश्वर माणिक पाखरे (३७) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. याबाबत एका महिलेने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. कौटुंबिक वादातून तक्रारदार महिला पतीपासून विभक्त झाली आहे. तक्रारदार महिला मूळची सांगली जिल्ह्यातील आहे. तिचा पती वाघोली भागात राहतो. महिलेने पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. तो मान्य करून न्यायालयाने तिला दरमहा पाच हजार रुपये पोटगी मंजूर केली. मात्र, पतीने पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तिने सहा लाख ६५ हजारांची थकीत पोटगी मिळण्यासाठी विटा न्यायालयात मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी अर्ज केला. न्यायालायने संबंधित अर्ज मंजूर केला.

महिलेनी केली तक्रार  (Anti Corruption Bureau Pune)

हे वॉरंट बजावण्यासाठी वाघोली पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले. या कामाची जबाबदारी पोलिस हवालदार पाखरे याच्याकडे होती. मात्र पाखरे हे वॉरंट बजावत नसल्याने महिलेने पाखरेची भेट घेतली. त्या वेळी त्याने वॉरंट बजावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार महिलेने याबाबत लाचलुचपतकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने वाघोली पोलिस ठाण्याच्या समोरील चहाच्या टपरीच्या परिसरात सापळा लावून पाखरे याला तक्रारदार महिलेकडून पैसे घेताना पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

RELATED NEWS

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments