Saturday, June 27, 2026
Home मनोरंजन विश्व Actor Dharmendra Death, Sad News : शोलेचा 'वीरू' काळाच्या पडद्याआड, धर्मेंद्र यांचे...

Actor Dharmendra Death, Sad News : शोलेचा ‘वीरू’ काळाच्या पडद्याआड, धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन : Veteran Actor Dharmendra Passes Away At The Age Of 89

Actor Dharmendra Death : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज सकाळी 9:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर विर्लेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

मुंबई : 24/11/2025

जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra Death) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी आपली कर्मभूमी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. नव्वदाव्या वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधी धर्मेंद्र यांचे निधन झाल्याने, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येत्या 8 डिसेंबरला त्यांचा 90 वा वाढदिवस होता. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. आज (24 नोव्हेंबर) सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दुपारी 12:30 वाजता त्यांचं पार्थिव विर्लेपार्ले इथल्या स्मशानभूमीवर आणण्यात आले. देओल कुटुंबियांसह स्मशानभूमीवर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि आमिर खानसुद्धा पोहोचले आहेत.

धर्मेंद्र हे बॉलिवूड मधील त्याकाळातील सर्वात हॅन्डसम हिरो म्हणून ओळखले जात होते. ‘हि मॅन’ ही उपाधी त्यांनी आयुष्यभर मिरवली. गेल्या सहा दशकाहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत कार्यरत होते. त्यांचा ‘इक्कीस’ हा शेवटचा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून धर्मेंद्र ओळखले जातात.

धर्मेंद्र यांचा परिचय आणि कारकिर्द  (Actor Dharmendra Death)

अभिनेते धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धर्म सिंह देओल असे आहे. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 ला झाला. भारतीय अभिनेता, निर्माता आणि राजकीय व्यक्ती म्हणूनही त्यांनी आपली कारकिर्द गाजवली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चित्रपटातील योगदानासाठी त्यांना 1997 मध्ये फिल्मफेयरचा मानाचा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कारने गौरविण्यात आले. भारताच्या 15 व्या लोकसभेचे ते सदस्य राहीले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून राजस्थानच्या बीकानेरचे चे प्रतिनीधी म्हणून निवडले गेले होते. 2012 मध्ये त्यांनी भारताच्या तीसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना पद्म भूषण पुरस्कार मिळाला होता.

धर्मेंद्र यांचे उल्लेखनीय चित्रपट (Actor Dharmendra Death)

सुरत और सीरत (1962), बंदिनी (1963), दिल ने फिर याद किया (1966), सीता और गीता, शोले, चरस, आजाद, कातिलों के कातिल, पत्थर ओर पायल, फूल और पत्थर, बहरिन फिर भी आयेगी, साथ. रेशन की डोर, लडकी हूं, काजल, पौर्णिमा, बहारों की मंजिल, चंदन का पालना , अनुपमा, आयी मिलन की बेला, आया सावन झुमके, मेरे हमदम मेरे दोस्त, इश्क पर जोर नही, कब, क्यु और कहा अशा असंख्य चित्रपटांमध्ये काम केले.

अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

RELATED NEWS

TET Exam Update, Big News : TET परीक्षेच्या शिक्षक संघटना आक्रमक, 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा : Teachers Union Aggressive Against Tet Exam...

TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई : 01/12/2025 टीईटी परीक्षा...

Sawai Gandhrva Bhimsen Mahotasav, 71th Event, 2025, Great News : समृद्ध परंपरा असणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ रंगणार पुण्यानगरीत, 10 ते 14 डिसेंबर ...

Sawai Gandhrva Bhimsen 79th Event : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरू सवाई गंधर्वांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर देश-विदेशातील कलाकार आणि...

Pankaja Munde PA Anant Garje Wife , Big News : पंकजा मुंडेंच्या पीए विरोधात अखेर गुन्हा दाख, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील तीनजणांवर गु्न्हा दाखल...

Pankaja Munde PA Anant Garje Wife : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी राहत्या घरात स्वतःला संपवले. आता गौरी यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments