Saturday, June 27, 2026
Home पुणे Asim Sarode news, Shocking News : ॲड. असिम सरोदेंची वकिलीची सनद तीन...

Asim Sarode news, Shocking News : ॲड. असिम सरोदेंची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचा निर्णय : Asim Sarode Lawyer Sanad Cancelled By Maharashtra Bar Council

Asim Sarode News : पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊ. 

पुणे : 03/11/2025 

पुण्यातील सुप्रसिदध कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे (Asim Sarode news) यांचा कायदेशीर परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. ॲडव्होकेट विविकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे निर्देश दिले आहेत. असीम सरोदे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबाबत केलेले आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत झालेल्या सुनावणीत सहभागी झालेल्या वकिलांपैकी एक आहेत. मात्र आता त्यांची सनद रद्द झाल्याने त्यांना न्यायलयात युक्तिवाद करता येणार नाही. याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी अद्याप या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेला नाही. 

असीम सरोदेंचे विधानं (Asim Sarode news)

माजी ॲडव्होकेट असीम सरोदेंनी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबाबत एका सार्वजनिक कार्यक्रमात काही वादग्रस्त विधाने केली होती. त्यांच्या विधानांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयांमध्ये अविश्वास निर्माण झाला, अशी तक्रार एका तक्रारदाराने केली होती. असीम सरोदेंचे विधान अशोभनीय , बेजबाबदार आणि बदनामीकारक असल्याचे नमूद करून बार कौन्सिलकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराने 19 मार्च 2024 रोजी सरोदेंनी लेखी माफी मागण्याची संधी दिली, पण त्यांनी ती नाकारली. त्यामुळे आता त्यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. 

ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने असीम सरोदे (Asim Sarode news) यांच्या भाषणाचे ट्रान्सक्रिप्ट आणि व्हिडिओ क्लिप्स पाहिले. व्हिडिओमध्ये असीम सरोदे स्पष्टपणे असे म्हणत आहे की, “राज्यपाल  निरूपयोगी आहेत”, आणि न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे. अशा कायद्यामुळे नागरिकांमध्ये न्यायालयांमध्ये अविश्वास निर्माण होतो. न्यायव्यवस्था आणि संवैधानिक पदाचा आदर करणे ही वकिलाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. वकिल हा ” न्यायालयाचा अधिकारी ” असल्याने त्याने संयम आणि न्यायव्यवस्थेचा आदर राखला पाहिजे, असे बार कौन्सिल समितीने म्हटले आहे. 

असीम सरोदे काय म्हणाले होते ? (Asim Sarode news)

मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा किंवा संविधानिक पदाचा अपमान केला नाही. माझे वक्तव्य हे लोकशाहीतील रचनात्मक टीका होती. फालतू हा शब्द मी अपमानार्थ नव्हे, तर सर्वसामान्य भाषेत वापरला होता. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. माझा हेतू न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्याचा नव्हता, तर लोकांना जागरूक करण्याचा होता, असे स्पष्टिकरण असीम सरोदे यांनी दिले होते.  

RELATED NEWS

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments