Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र CM Devendra Fadnavis In Gadchiroli,12 Naxal Surrenders : गडचिरोलीतील 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण,...

CM Devendra Fadnavis In Gadchiroli,12 Naxal Surrenders : गडचिरोलीतील 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पोलीसांचा गौरव

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला (Gadchiroli ) भेट दिली. या भेटींमध्ये 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण झाले. यावेळी त्यांनी नक्षलविरोधी पथकाचा सत्कार केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावरही चर्चा केली. 

गडचिरोली : 2025-06-06

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (CM Devendra Fadnavis )यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला (Gadchiroli ) भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच नक्षलविरोधी पथकातील जवानांचा सत्कार केला. या दौऱ्यात फडणवीसांनी अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत, अनेक मुद्द्यावर चर्चा केली. त्यांच्या या दौऱ्यावेळी अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन, त्यांच्या सत्कार करण्यात आला. 

नक्षलवादी पथकातील जवानाचा सत्कार 

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis ) यांनी दुर्गम भागातील पोली, ठाण्यांना भेट देऊन नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या जवानांसोबत अभियानाची माहिती घेतली. गडचिरोली जिल्हा (Gadchiroli ) नक्षलग्रस्त असल्याने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक मार्गावर नक्षलविरोधी पोलीस पथकाचे जवान तैनात होते. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि कॉम्पेक्स भागात श्वान पथकांसह कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. 

गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नक्षलविरोधी पोलीस पथकातील जवानांचा सत्कार करण्यात आला. कवंडे पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. या नक्षलविरोधी पोलीस पथकाने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल हा सत्कार करण्यात आला. यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम.रमेश, विशाल नागरगुजे यांच्यासह 17 पोलीस जवानांचा समावेश होता. मुख्यमंत्री एकलव्य हॉलमध्ये पोलीस जावानांना मुख्यमंत्र्यांनी संबोधीत केले. गेल्या चार-पाच वर्षांत नक्षल चळवळीला आळा घालण्यात नक्षलविरोधी पोलीस पथकाने मोठी यशस्वी कामगिरी केल्याचे कौतुक केले. 

गडचिरोली जिल्ह्यात आता फक्त चाळीस माओवादी उरले असून, माओवादी चळवळीला हादरा बसवण्याचे काम पोलीस जवानांनी केले. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही कौतुक केले. 

12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण आणि विवाह सोहळा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस मुख्यालयात 12 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये नक्षल चळवळीत डीव्हीसीएम (DVCM) पदावर कार्यरत असलेल्या अंजू आणि सरिता या दोन महिला माओवाद्यांनी- एके-47 रायफलसह आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना संविधान भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. 

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचा लग्नसोहळा देखील पोलीस अधीक्षक कार्यालयात मुख्यमंत्री यांच्या उस्थितीत संपन्न झाला. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना मुख्यमंत्र्यांकडून भेटवस्तूही देण्यात आल्या. आत्मसमर्पण योजनेतून अनेक माओवाद्यांना नोकरी देण्याते काम हे महाराष्ट्र राज्य सरकार आणि लॉईड मेटल कंपनी करत आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार धर्मराव बाबाअत्राम, आमदार मिलिंद नरोटे, पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा नियोजन समितिची बैठक 

यानंतर गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि तीन आमदार उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा मुद्दा, वाघाची दहशत आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान अशा अनेक प्रश्नंवर यावेळी चर्चा केली. 

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

Pune Metro News, Good News, 2025: पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी : Modi Government Aprrove...

Pune Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. पुणे :...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments