Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Gopinath Munde Death Anniversary : गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला पंकजा मुंडे भावूक, लोकांना...

Gopinath Munde Death Anniversary : गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला पंकजा मुंडे भावूक, लोकांना साथ देण्याची हाक .

महाराष्ट्र  : 2025-06-03

महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंगळवारी गोपीनाथ गड येथे हजेरी लावली.  त्यांचे वडील आणि भाजपाचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगढ येथे एका सभेचे आयोजन केले होते. यावेळी त्या भावूक झाल्याचे दिसले. त्या म्हणाल्या, जर लोकं माझ्या सोबत असतील तर मी कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार आहे. यावेळी त्यांनी पांडवांच्या वनवासासुद्धा उल्लेख केला. त्या म्हणाल्या जीवनात खऱ्या आणि सरळमार्गी लोकांना कायम संकटांचा सामना करावा लागतो. 

पंकजा मुंडे या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde ) यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथगडावर बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय भाषणात लोकांना आपल्याला साथ देण्याचे भावनिक आवाहन केले. त्यांनी या भाषणात कौरव आणि पांडवांच्या भांडणाचाही उल्लेख केला. यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते आणि पंकजा मुंडे यांचे चुलत बंधु हे सार्वजनिक व्यसपीठावर दिसून आले. 

खऱ्या लोकांना संकटांचा सामना करावा लागतो.

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्याशी धनंजय मुंडे यांचे सबंध असल्याने टिका झाली. ज्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला. पंकजा मुंडे यांनी त्यासंदर्भात म्हटले की, खऱ्या लोकांना नेहमी संकटांचा सामना करावा लागतो. कौरव आणि रावणाला वनवास नाही झाला, पण पांडवांना वनवासाला जावे लागले. 

जर लोकं सोबत असतील तर मी संकटांना सामोरे जायला तयार 

जर लोकं माझ्या सोबत असतील, तर मी प्रत्येक संकटांना तोंड द्यायला तयार. आपल्या वडिलांच्या निधनानंतरच्या आपल्या प्रवासाविषयी बोलताना त्या (Pankaja Munde) म्हणाल्या, मी गेल्या 11 वर्षांपासून या व्यासपिठावर येऊन बोलत आहे. जेव्हा गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले, तेव्हा असे वाटले की आमच्यावर वीज येऊन कोसळली आहे.  त्यांनी आपल्या भाषणात महाभारतातील द्रौपदीच्या संकटांचा उल्लेख केला. द्रौपदीवर संकट आले. तेव्हा सुरूवातीलाच तिने मदतीसाठी भगवान श्रीकृष्णाला हाक मारली नाही. जेव्हा तीने त्यांना बोलावले, तेव्हा ते तिच्या मदतीसाठी प्रकट झाले. भगवान सुद्धा आपण जोपर्यंत काही मागत नाही, तोपर्यंत आपल्याला काही देत नाहीत. 

या कार्यक्रमाच्या वेळी धनंजय मुंडे यांनी कोणतेही भाषण केले नाही. 

RELATED NEWS

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against...

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत आणि इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर मोर्चा...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Parliament Winter Session, Big News 2025 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गोंधळ, विरोधकांकडून ‘व्होट चोर गद्दी छोड’चा नारा : Chaos Continues In Parliament...

Parliament Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान दुसऱ्या दिवशीही गोंधळ झाला. चर्चेदरम्यान एसआयआर हा शब्द टाळून "निवडणूक सुधारणा" किंवा इतर नावाने हा विषय कामकाजात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments