Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Leopard Spotted On Pune Airport, Alert News : पुणे विमानतळाच्या धावपट्टी...

Leopard Spotted On Pune Airport, Alert News : पुणे विमानतळाच्या धावपट्टी जवळ मध्यरात्री बिबट्या आढळला, अनर्थ टळला : Leopard Spotted In near Pune Airport Area

Leopard Spotted On Pune Airport : ग्रामिण भागात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले असताना, आता हे संकट पुणे विमानतळाच्या परिसरापर्यंत आले आहे. आता बिबट्याला पकडण्यासाठी लोहगाव परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे.

पुणे : 22/11/2025

पुणे विमानतळाच्या धावपट्टीलगत असलेल्या टॅक्सी वे के 4 परिसरात गुरूवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास बिबट्या (Leopard Spotted On Pune Airport) आढळून आला. गेल्या दोन दिवसांत या भागात बिबट्याचे हे दुसऱ्यांदा दर्शन झाले आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी विमानांची सर्वाधिक वाहतूक असतानाच बिबट्या पार्किंग गेट क्रमांक 8,9  आणि 10 पासून काहीच अंतरावर दिसला.

सुदैवाने तो थेट धावपट्टीवर पोहोचला नाही. या आठवड्यात मंगळवार आणि गुरूवारी मध्यरात्री बिबट्या धावपट्टीवर पोहोचला नाही. या आठवड्यात मंगळवारी आणि गुरूवारी मध्यरात्री बिबट्या धावपट्टीजवळील टॅक्सी वे -4 परिसरात दोनदा दिसल्याची नोंद आहे.

पहिल्यांदा त्याचे अस्तित्व हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले, तर गुरूवारी रात्री ग्राऊंड स्टाफने बिबट्या पहिल्याचे समजते. त्यावेळी धावपट्टी रिकामी असल्याने अनर्थ टळला. रे-4 हा मार्ग टर्मिनलला जोडणाऱ्या समांतर टॅक्सीवेद्वारे महत्त्वाचा असल्याने ही घटना गंभीर मानली जात आहे.

वन विभागाच्या सूचनांकडे विमानतळ प्रशासनाचे दुर्लक्ष  (Leopard Spotted On Pune Airport)

यापूर्वीच्या घटनेनंतर वन विभागाने विमानतळ प्रशासनाला लोहगावच्या दिशेने असलेल्या संरक्षणभिंतीची डागडुजी तातडीने करण्याचे पत्र दिले होते. मात्र, अद्यापही भिंत दुरूस्तीअभावी तशीच असून, या भिंतीतूनच बिबट्या विमानतळ परिसरात येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. के-4 परिसरातील लोहगाव परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत.

कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे. धावपट्टीखालील गटारांनाही जाळ्या लावून बंद कऱण्यात आले आहे. बिबट्याच्या वारंवार होत असलेल्या हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. विमान प्रवास सुरळीत ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची गरज आहे.

 तज्ञांचे म्हणणे आहे की संयुक्त मोहिमेची गरज  (Leopard Spotted On Pune Airport )

धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर असणे हे विमान व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर आहे. हवाई दल,विमानतळ प्रशासन आणि वन विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बिबट्याला पकडावे.

– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतून तज्ञ

विमानतळाच्या आत व लोहगाव परिसरात दिसणारा बिबट्या हा एकच असून, दहा दिवसांनी तो पुन्हा विमानतळावर आला आहे. त्यावरून त्याचे क्षेत्र वाढत असल्याचा अंदाज आहे.

 – मंगेश ताटे, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वन विभाग

RELATED NEWS

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments