Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Local Train Speed Reduced On Bends After Mumbai Train Accident : मुंब्रा...

Local Train Speed Reduced On Bends After Mumbai Train Accident : मुंब्रा लोकल अपघातानंतर फास्ट ट्रॅक वळणावर लोकलचा वेग मंदावला

Mumbra Accident : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मंगळवारी मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर रेल्वेचा वेग कमी केला आहे. खबरदारी म्हणून वळणावर वेग कमी केला गेला. अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई : 2025-06-10

मुंबईतीली मुंब्रा रेल्वे अपघात (Mumbra Accident ) प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर रेल्वेचा वेग कमी केला आहे. कल्याण ते सीएसटीच्या दिशेने धावणाऱ्या मध्य रेल्वे सोमवारी ज्या वेगवान धावत होत्या, तो वेग आता नाही. या वळण रस्त्यावर लोकलचा वेग कमी करण्यात आला आहे. आता पूर्वीच्या वेगाने धावताना मध्य रेल्वे दिसत नाही. अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे मंडळीने सोमवारी सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय जाहीर केला होता. 

अपघाताबद्दल मोठा दावा 

लोकलमध्ये असलेल्या प्रचंड गर्दीमुळे अनेकजण रेल्वेच्या दरवाज्यामध्ये उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे सोमवारी तेरा व्यक्ती लोकलमधून पडून जखमी झाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे.  काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे रेल्वेने आता खबरदारी म्हणून या वळण रस्त्यावर वेग कमी केल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी झालेल्या अपघाताबद्दल मोठा दावा करण्यात आला आहे. लोकलमधील प्रवाशांनी तीन ते चार वेळा चेन खेचली होती. त्यानंतर ट्रेन थांबली नाही. मोटरमनने थेट ठाण्याला लोकल थांबवली, असे अपघातात मृत्यू झालेल्या केतन सरोज याचा मित्र आणि घटनेचा प्रत्यक्षदर्शी दीपक शिरसाठ यांनी सांगितले. लोकल थांबली असती तर काहींचे प्राण वाचले असते. असे शिरसाठ यांनी म्हटले. 

दूर्घटेनत मृत पावलेला केतन सरोज (23) आणि दीपक हे दोघेही उल्हासनगरातील रहिवासी आहेत. दोघेही ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कमधील कामाला जात होते. सकाळी साडेआठ वाजता शहाड येथून कसारा सीएसएमटी फास्ट लोकल पकडली. डोंबिवलीत आणि दिव्यात गर्दी झाली. मुंब्रा काही अंतरावर अरूंद वळणावर दोन्ही रेल्वे रूळावर अंतर कमी झाले. लोकलमधील एका प्रवाशाची बॅग दुसऱ्या डब्यातील प्रवाशांना लागली. त्यामुळे प्रवासी पडले. 

राहुल बहिणीच्या लग्नासाठी जमवत होता पैसे 

मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून राहुल गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. डिलव्हरी बॉय म्हणून काम करणारा राहुल बहिणीच्या लग्नासाठी पै-पै जमवत होता. घरातील मुख्य कमावता सदस्य तो होता. या घटनेनंतर दिवा स्थानकातून थेट लोकल सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

मंगळवारी लोकल उशिराने 

कल्याण ते सीएसटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील मध्य रेल्वे मंगळवारी 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे. यामुळे मुंब्रास रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. वातानुकूलीत लोकलमध्ये देखील रेल्वे प्रवाशांना आज शिरता येत नाही, इतकी गर्दी झाली आहे. अनेक दरवाजे बंद देखील होत नाही. 

 

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

TET Exam Update, Big News : TET परीक्षेच्या शिक्षक संघटना आक्रमक, 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा : Teachers Union Aggressive Against Tet Exam...

TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई : 01/12/2025 टीईटी परीक्षा...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments