Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Big News For MSRTC Kokan Passengers ; Good News 2025 Ganeshotsav,...

Big News For MSRTC Kokan Passengers ; Good News 2025 Ganeshotsav, One side Reservation Fare Hike : कोकणात एसटी प्रवाशांसाठी मोठी सवलत, विशिष्ट श्रेणीची भाडेवाढ रद्द, गणेशोत्सव 2025 साठी एसटीची जय्यत तयारी !

MSRTC Kokan Passengers : कोकणात गौरी-गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी असून आताया श्रेणीच्या आरक्षणावरील भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली आहे. 

मुंबई : 24/07/2025

गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीच्या बसेसच्या एकेरी गट (एका दिशेचे) आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे. एसटी बसेसची 30 टक्के भाडेवाढ झाल्यानंतर नागरिकांमध्ये नाराजी होती. कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ अखेर मागे घेण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देलेल्या निर्देशानुसार मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 

मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गेली 77 वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा देता आली आहे. महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला फायदा-तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासा बरोबरच सण, यात्रा, उत्सव, लग्नकार्य यासाठी एसटी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते. विशेषतः गणपती उत्सव, आषाढी यात्रा, होळीचा उत्सव, लग्नकार्य यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. यंदा देखील मुंबई व उपनगरातील चाकरमानी-प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल 5 हजार जादा एसटी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एसटीने केले आहे. यामध्ये शासनाने दिलेल्या अमृतज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू असतात. 

प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करत असल्याने परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो. सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेलेया असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते. गे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो ! तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर 30 टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तसेच मुंबई व उननगरातील मराठी चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता, एकेरी गट आरक्षणावरील 30 टक्के भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे. 

गेल्यावर्षी 11.68 कोटी रूपयांचे नुकसान ( MSRTC Kokan Passengers )

 गेल्यावर्षी एसटी महामंडळाने गणपती उत्सवासाठी जाताना 4330 बसेस आणि परतीच्या प्रवासाठी 1104 बसेस उपलब्ध करून दिलेल्या होत्या, एकेरी गट आरक्षणामुळे गणपती उत्सवाच्या काळामध्ये प्रवाशांना कोकणात त्यांच्या इच्छित स्थळी पोचवून रिकाम्या बसेस परत आणाव्या लागतात. तसेच त्यांना परतीच्या प्रवासासाठी देखील बसेस उपलब्ध करून देताना रिकाम्या बसेस राज्याच्या विविध भागातून कोकणात पाठवाव्या लागल्या. यातून गणपती उत्सवाच्या काळामध्ये मिळालेल्या उत्पन्नामध्ये तब्बल 11 कोटी 68 लाख रुपये तोटा महामंडळाला सहन करावा लागला होता. यंदा 5 हजार बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या बस एकेरी गट आरक्षणासाठी अरक्षित झाल्यास हा तोटा 13 ते 16 कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

 अत्यल्प भाडेवाढ सहन करावी, सरनाईक यांचे आवाहन ( MSRTC Kokan Passengers )

कोकण आणि एसटी बस हे अतूट समीकरण आहे. त्यामुळे तोटा सहन करून देखील एसटी महामंडळाने गणपती उत्सव, दिवाळी, होळी या सारख्या उत्सव काळात चाकरमान्यांना नेहमीच प्रवासी सेवा देता आली आहे. यापुढेही देत राहिल, परंतु चाकरमानी प्रवाशांनी देखील एसटीच्या आर्थिक परिस्थितीचा गांभिर्याने विचार करावा. कारण सध्या उत्सव काळामध्ये खासगी बसेस भरमसाठ भाडेवाढ करतात. खासगी वाढत्या तिकीट दरात्या तुलनेमध्ये एसटीचे तिकीट दर हे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे भविष्यात एसटीने तत्कालीन दरवाढ केल्यास प्रवाशांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. 

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

TET Exam Update, Big News : TET परीक्षेच्या शिक्षक संघटना आक्रमक, 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा : Teachers Union Aggressive Against Tet Exam...

TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई : 01/12/2025 टीईटी परीक्षा...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments