Saturday, June 27, 2026
Home पुणे Pune Metro; Good News For Punekar's : पुणेकरांसाठी खुशखबर ! पुणे मेट्रोच्या...

Pune Metro; Good News For Punekar’s : पुणेकरांसाठी खुशखबर ! पुणे मेट्रोच्या 5.46 किमी भुयारी मार्ग विस्तार आणि 5 नव्या स्टेशन निर्मितीला गती ! .

Pune Metro Train Project : शहरातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या पुणे मेट्रोला आता आणखी गती मिळणार आहे. महामेट्रो (Maha Metro ) ने स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा विस्तार आणखी जलदगतीने करण्यासाठी एका प्रायव्हेट कंपनीशी करार केला आहे.

पुणे : 22/09/2025

पुणे मेट्रो रेल्वे (Pune Metro ) प्रकल्पाला आता आणखी गती मिळणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड  (Mahametro) ने स्वारगेट ते कात्रजपर्यंतच्या नियोजित भुयारी मार्गासाठी आता एका खाजगी कंपनीची निवड केली आहे. महामेट्रोने ITD सीमेंटंशन इंडिया लिमिटेड कंपनीला या भुयारी मार्गासाठी काम दिले आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचे काम आता ही कंपनी करणार आहे.

या मार्गाचा एकुण खर्च 1,643,88 करोड रूपये इतका असणार आहे. या निर्णयामुळे आता या मार्गाच्या कामाला गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग योजना ( Pune Metro )

स्वारगेट ते कात्रज पर्यंतचा हा मेट्रोचा भुयारी मार्ग ‘पर्पल लाईन’ च्या अंतर्गत P1A-UGC(R) निर्माण करण्यात येणार आहे. या मार्गाची एकुण लांबी सुमारे 5.46 किलोमीटर इतकी असणार आहे. हा मार्ग भुयारी असणार आहे. या संपूर्ण मार्गाच्या प्रकल्पाअंतर्गत 5 मेट्रो स्टेशन असणार आहेत. मार्केटयार्ड (गुलटेकडी), बिबवेवाडी, पद्मावती, बालाजी नगर आणि कात्रज नगर आणि कात्रज मार्ग येथे दुहेरी अंडरग्राऊंड स्टेशन असणार आहेत.

दोन स्टेशनची अधिक निर्मिती  (Pune Metro)

याआधी या मार्गावर केवळ तीन स्टेशन असणार होते. मात्र नागरिक आणि लोकप्रतिनीधींच्या आग्रहास्तव आणखी दोन स्टेशनची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. आणि आता तो पूर्ण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मेट्रोचा विस्तार होणार असून, नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुखकर होणार आहे. महामेट्रोने या मार्गासाठी प्रस्तावित रक्कम 2,144 करोड रुपये इतकी निश्चित केली होती. त्यासाठी कुमार इंफ्राप्रोजेक्टस, एलएंडटी, टाटा प्रोजेक्टस, अफकॉन-सैम इंडिया जेवी आणि एससीसी-कल्पतरू जेवी यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी या प्रकल्पासाठी टेंडर भरले होते. मात्र ITD सीमेटेशन चे दर निश्चित दरांपेक्षा सुमारे 24 टक्क्यांनी कमी असल्याकारणाने त्यांना हे काम देण्यात आले आहे.

42 महिन्यात होणार मार्ग निर्मिती  (Pune Metro)

या मार्गाचे काम पुर्ण करण्यासाठी 42 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. जर काम वेळेत सुरू झाले तर हा मार्ग 2029 पर्यत नागरिकांसाठी खुला होऊ शकतो. प्रस्तावित योजनेनुसार 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये साईटची तयारी आणि शिफ्टिंगसारखे कामं सुरू करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या तीन महिन्यात सिव्हिल कामांची सुरूवात करण्यात येणार आहे. 2027 च्या दुसऱ्या तीमाही मध्ये भुयारी मार्गासाठीच्या टनेलिंगचे काम सुरू होऊ शकते.

स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे काम पुर्ण झाल्यानंतर पुण्यातील नागरिकांसाठी मोठी मदत होणार आहे. दैनंदिन प्रवासात जो वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो तो कमी होणार आहे. त्यामुळे सामान्यांमध्ये या मार्गासाठी आतुरता आहे.

RELATED NEWS

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments