Saturday, June 27, 2026
Home क्रीडा RCB Victory, IPL Match : अखेर RCB ठरली चँपियन; तब्बल 18 वर्षांची...

RCB Victory, IPL Match : अखेर RCB ठरली चँपियन; तब्बल 18 वर्षांची प्रतिक्षा संपली .

 IPL Final 2025 :  रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ने IPL च्या 18 व्या सीजनचे विजेतेपद मिळवले. या अविस्मरणीय प्रवासात टिमच्या प्रत्येक सदस्याचा मोठा वाटा होता. सगळ्यांनीच आपला उत्तम खेळ दाखवत, या विजयात आपले योगदान दिले . रंगतदार वातावरणात हा अंतिम सोहळा पार पडला. विजयानंतर भारताचा लाडका फलंदाज विराट कोहली भावूक झालेला पहायला मिळाला. RCB च्या या विजयाची एक झलक…

आयपीएल : 2025-06-04

तब्बल सतरा वर्षांची प्रतिक्षा संपली आणि विराट कोहलीच्या हाती IPL ची ट्रॉफी विराजमान झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने IPL च्या 18 व्या सीजनमध्ये आपल्या नावावर पहिल्यांदाच ट्रॉफी नोंदवली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर मंगळवारी हा फायनलचा रंगतदार सामना पार पडला. पंजाब किंग्जला 6 धावांनी पराभूत करत RCB ने आपल्या नावावर पहिली ट्रॉफी जिंकली. आणि पंजाब किंग्ज विजेपदाने हुलकावणी दिली. 

RCB ने यावर्षी ऑक्शननंतर रजत पाटीदारच्या हातात टीमची धुरा सोपवली होती. IPL मध्ये पहिल्यांदाच कप्तानी करत असणाऱ्या रजत ने आरसीबीला  14 पैकी 11 मॅचचे विजेतेपद मिळवून दिले. यापैकी 9 मॅच मध्ये 9 वेगळेवेगळे खेळाडू मॅन ऑफ द मॅच विनर ठरले हे विशेष. 

विराट कोहलीसाठी ही मॅच फार खास ठरली. ICC साठी सगळ्या ट्रॉफी जिंकणाऱ्या विराट कोहलीला आयपीएलचे विजेतेपद मात्र दरवर्षी हुलकावणी देत होतं. त्याच्यासाठी हे स्वप्न पूर्ण झालं. 

IPL 2025 ची काही वैशिष्ट्ये : 

  • फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जशी आरसीबीची लढत होती. दोन्ही संघ पहिल्यांदाच विजयी होत ट्रॉफी पटकावण्यासाठी प्रयत्न करत होते. बंगळुरूने पंजाबच्या टिमला 6 धावांनी हरवलं आणि ट्रॉफी मिळवली. 
  • भारतासाठी आयसीसी च्या सर्व ट्रॉफी जिंकणाऱ्या विराट कोहलीकडे 2024 पर्यंत आयपीएलची ट्रॉफी नव्हती. त्यावरून विराटला बरंच ट्रोल करण्यात आले. परंतु कोहली ने RCB ची साथ सोडली नाही. आणि फ्रँचाइजीनेसुद्धा विराटला सोडले नाही हे विेशेष. आरसीबीने कोहलीला 21 करोड देऊन रिटेन केले. टिममध्ये कोहली टॉप स्कोअर करणारा खेळाडू आहे. 
  • आरसीबी टिम ही आयपीएल मधील निवडक टिम मधील एक खास टिम मानली जाते. आत्तापर्यंत ही टीम तीन वेळा फायनल पर्यंत पोहोचली. मात्र 2025 ला अखेर विजेतेपद मिळाले. आरसीबीने 2009, 2011, 2016 या तीनही वर्षी फायनल खेळल्या. मात्र तीनही वर्षी अपयश मिळाले. 
  • आरसीबीचा मालक कोण ? अशी चर्चा नेहमी होते. विजय मल्ल्या हे नाव सर्वांना वाटत असले तरी, गेल्या काही वर्षांपासून मल्ल्या आरसीबीचे मालक नाहीत. युनायटेड स्पिरिटस लिमिटेड नावाच्या कंपनीकडे आरसीबीची मालकी आहे. ही एक मोठी मद्य उत्पादक कंपनी आहे. युनायटेड चेअरमन महेंद्र कुमार शर्मा (MK Sharma ) हे आहेत. 

 

 

RELATED NEWS

CommonWealth games 2030, Great News : भारताला राष्ट्रकुल 2030 स्पर्धेच्या यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार का ? जाणून घ्या काय आहे माहिती : Indias...

CommonWealth games 2030 : पुढील राष्ट्रकुल स्पर्धा आता 2030 मध्ये होणार आहेत. त्या कोणत्या देशात भरवण्यात येणार याचे भवितव्य ठरणार आहे. भारत या स्पर्धेचे...

Indian Women Cricket Team , Great Meet : जगज्जेत्या महिला संघाकडून राष्ट्रपतींना स्वाक्षरी केलेली जर्सी भेट, मुर्मू यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक : President Receives Signed...

Indian Women Cricket Team : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी राष्ट्रपती भवनात आयसीसी  महिला एकदिवसीय विश्वचषक विेजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली. संघाकडून सर्व...

PM Narendra Modi, Great meet : विश्वकप विजेत्या महिला क्रिकेटपटूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट ! PM Narendra Modi Meetin with Indian Womens Team

PM Narendra Modi : आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांची भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर पंतप्रधानांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments