Saturday, June 27, 2026
Home सण समारंभ Vasubaras Festival 2025, Religiously Big Day: वसुबारस म्हणजे काय ? का साजरा...

Vasubaras Festival 2025, Religiously Big Day: वसुबारस म्हणजे काय ? का साजरा करतात हा सण ? जाणून घ्या सर्वकाही.

Vasubaras Festival 2025 : दिवाळी या महत्त्वाच्या सणाची सुरूवात होते ते वसुबारस या दिवसापासून. या दिवसाचे काय महत्त्व आहे, कसा साजरा करतात हा दिवस हे जाणून घेऊ.

विशेष लेख : 16/10/2025

भारतातील एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘दिवाळी’. सुमारे पाच ते सहा दिवस साजरा करण्यात येणारा असा हा सण. या दिवसाची सुरूवात होते ती ‘वसुबारस’ (Vasubaras Festival 2025) या दिवसापासून. हा सण अश्विन महिन्यातील वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हणतात. खरं तर हा दिवस शेतीप्रधान देशासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याकडे शेतकरी आणि हिंदू धर्मात ‘गायी’ ला देव मानतात. त्यामुळे या गायीविषयी कृतज्ञा व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. जाणून घेऊया या विशेष लेखातून या दिवसाचे महत्त्व.

कसा साजरा करतात हा दिवस ? (Vasubaras Festival 2025)

या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. घरात जर गाय आणि वासरू असेल तर त्यांची पूजा केली जाते. दिवाळीच्या या दिवसापासूनच संध्याकाळी अंगणात दिवे लावले जातात. रांगोळी काढण्यास सुरूवात केली जाते. गाय, वासरू यांची पूजा करून, त्यांना भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. गोडधोड खाऊ घातले जाते. काही स्रिया या दिवशी ‘उपवास’ करतात. गाय आणि वासरू यांना अंघोळ घालून, त्यांना हळद-कुंकू लावले जाते. त्यांचे औक्षण केले जाते.

जर तुमच्याकडे गाय-वासरू नसेल तर आजकाल शहरात गाय-वासराचे छायाचित्र लावून त्यांची पूजा करतात. नैवेद्य दाखवतात. गह्या दिवशी गहू, मूग हे धान्य न खाण्याची प्रथा काहीजण पाळतात. ज्या स्रिया उपवास करतात, त्या संध्याकाळी गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवून, ते खाऊन उपवास सोडतात.

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश्य (Vasubaras Festival 2025)

भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील जास्त जनता ही ग्रामीण भागातून येते. अशावेळी आपल्या अनेक सणांना शेती आणि त्यापूरक व्यवसायाची पार्श्वभूमी आहे. जसे की पोळा, मकर संक्रात. तसाच हा दिवस आहे. पोळ्याला शेतीसाठी राबणाऱ्या बैलांची पूजा केली जाते. संक्रात हा सण नवीन पिके आल्यावर, त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी खरं तर साजरा करतात. तसाच हा वसुबारसेचा दिवस. शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांइतकेच महत्त्व आहे गायीचे. तिच्या दूध, शेण, गोमूत्र यांपासून त्याला अनेक फायदे मिळतात. त्यातून तो अनेक अर्थाजनाचे व्यवसाय करत असतो. अशावेळी तिच्याविषयी कृतज्ञा व्यक्त करण्यासाठी गाय-वासराची पूजा केली जाते.

भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे. घरात सुख समाधान लाभावे, म्हणून ही पूजा केली जाते. संध्याकाळी अंगणातील तुळशीपुढे, परिसरात दिवे लावून दिवाळीची सुरूवात होते. दिवाळीचा पहिला दिवस गोपूजन करून साजरा केला जातो. दिवाळीच्या सणाची सुरूवात म्हणूनही या दिवसाला महत्त्व आहे.

यावर्षी कधी आहे वसुबारस ? (Vasubaras Festival 2025)

यावर्षी दिवाळीचा हा पहिला दिवस 17 ऑक्टोबर 2025 या दिवशी आहे. मिसलेनियस मीडिया हाऊसच्या सर्व वाचकांना येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा.

RELATED NEWS

Navaratra Utasav 2025 : शारदीय नवरात्र 2025 : घटनास्थापना विधी कसा आणि कधी करावा ? जाणून घ्या शुभ मुहूर्त.

Navaratra Utasav 2025 : हिंदू धर्मातील उत्सवांपैकी एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र. या काळात नऊ दिवस देवीची उपासना केली जाते. भारताच्या प्रत्येक प्रांतात...

Chaturmas 2025 : जाणून घ्या चातुर्मास म्हणजे काय ? काय आहे धार्मिक महत्त्व ? : What Is the Meaning Of Chaturmas (2025) ? Know...

Chaturmas Mass 2025 : नुकतीच आषाढी एकादशी झाली. गेले महिनाभर महाराष्ट्रात पंढरपूपच्या वारीचे वातावरण होते. आता पंढरपूरच्या या सुंदर प्रवासाचे रिंगण पूर्ण झाले आहे....

International Museum Day 18 May : जागतिक संग्रहालय दिवस, विशेष; सफर पुणे शहरातील संग्रहालयांची.

मिसलेनियस विशेष लेख : 05/18/2025 जागतिक संग्रहालय दिवस दरवर्षी 18 मे ला साजरा करतात. संग्रहालयं ही त्या त्या देशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतीक, सामाजिक आणि राजकिय घटनांचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments