Saturday, June 27, 2026
Home पुणे Alandi PMPML Bus, Good News : 'पीएमपी'ला आळंदी बस आगारासाठी एसटी...

Alandi PMPML Bus, Good News : ‘पीएमपी’ला आळंदी बस आगारासाठी एसटी महामंडळाकडून 4 एकर जागा : PMP gets 4 Acres Of Land From St Corporation For Alandi Bus Depot

Alandi PMPML Bus News: एसटी मालकी असलेली आठ एकरांची जागा असून त्यापैकी चार एकर पीएमपीएमएलला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या जागेवर सुमारे 80 बसगाड्या थांबू शकतील, असे आगार बांधकामाचे नियोजन आहे.

पुणे : 26/11/2025

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (Alandi PMPML Bus ) आणि महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन (एसटी महामंडळ) यांच्या दरम्यान आळंदी परिसरात नवीन बस आगार स्थापन कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत एसटीकडून चार एकर जमीन पीएमपीएमएलला देण्यास मंजूरी मिळाली आहे.

प्रस्तावनुसार, एसटीची मालकी असलेली आठ एकरांची जागा असून त्यापैकी चार एकर पीएमपीएमएलला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या जागेवर सुमारे 80 बसगाड्या थांबू शकतील, असे आगार बांधकामाचे नियोजन आहे. या निर्णयामुळे आळंदी आणि आसपासच्या भागातील सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. बस आगारामुळे बस रॅपिंग , देखभाल व पार्किंगची सोय सुलभ होईल आणि प्रवाशांना नियमित सेवा मिळण्यास मदत होईल.

स्थानिक वाहनधारक तसेच प्रशासनाने या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता पुढील टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालयातून आवश्यक कागदपत्रांची परवानगी, जागेचे नकाशे मान्यता करणे व बांझकामाचा समावेश होईल. आ प्रकल्पाचे वेळापत्रक आणि बांधकाम खर्च याबाबत अधिक माहिती पुढील महिन्यात जाहीर कऱण्यात येईल, अशी माहिती पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात( Alandi PMPML Bus )

पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा म्हणून पीएमपीला ओळखले जाते. रोज सुमारे 11 लाख प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचविणाऱ्या या पीएमपीचे स्टियरिंग आता ठेकेदारांच्या हाती जात आहे. सध्या पीएमपीचे स्वमालकीचे 1 हजार 25 बस असून ठेकेदरांचे 1 हजार 173 बस आहेत. येत्या काही महिन्यात पीएमपीएलमध्ये 1 हजार नवीन सीएनजी बस दाखल होणार आहेत. त्यावेळी ठेकेदरांची बस संख्या ही 2 हजार 173 होईल. पीएमपीत ठेकेदारांची वाढते वर्चस्व हे नक्कीच सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने नुकसानदायक ठरणार आहे.

सध्या किती बस आहेत पीएमपीएलच्या ताफ्यात ( Alandi PMPML Bus )

पीएमपीएलच्या ताफ्यात सध्या एकुण 2,198 बस आहेत. त्यापैकी 1,173 बस ठेकेदरांच्या मालकीच्या आहेत, तर 1,025 बस पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. सध्या 490 इलेक्ट्रिक बस, 1,281 सीएनजी बस आणि 227 डिझेल बस पीएमपीमध्ये कार्यरत आहेत.

यापैकी 798 सीएनजी आणि सर्व 227 डिझेल बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत, तर 490 इलेक्ट्रिक व 483 सीएनजी बस ठेकेदारांच्या आहेत. आता लवकरच 1,000 नवीन सीएनजी बस ताफ्यात दाखल होणार असून त्या सर्व ठेकेदरांच्या मालकीच्या असणार आहेत. त्यामुळे पीएमपीच्या बस व्यवस्थापनात खाजगीकरण्याच्या झपाट्याने शिरकाव होत असल्याचे स्पष्ट दिसून येत.

RELATED NEWS

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments