Saturday, June 27, 2026
Home मुंबई Maharashtra Ration Card Holder, Great News 2025 : महाराष्ट्रातील रेशनकार्डधारकांना आता...

Maharashtra Ration Card Holder, Great News 2025 : महाराष्ट्रातील रेशनकार्डधारकांना आता ज्वारीसुद्धा मिळणार मोफत : Along with Wheat And Rice Jowar Will Also Be Distributed Free Of Cost to Ration Card Holder

Maharashtra Ration Card Holder : महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. रेशनकार्ड धारकांना आता गहू आणि तांदूळ या धान्यासोबत ज्वारीसुद्धा मोफत मिळणार आहे. कधी पासून ही योजना सुरू होणार आहे हे जाणून घ्या.

पुणे : 14/10/2025

महाराष्ट्रातील रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे. पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता रेशनकार्डधारकांसाठी (Maharashtra Ration Card Holder) दिवाळीच्या तोंडावर एक चांगली योजना आली आहे. त्यांना आता गहू आणि तांदुळासह ज्वारीसुद्धा मोफत मिळणार आहे. या तीनही धान्यांचे वितरण आता मोफत केले जाणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय ज्वारीचे भरपूर पिक मागच्यावर्षी झाले होते म्हणून घेतला आहे. सरकारने ज्वारीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे हे मोफत वितरण शक्य होणार आहे.

केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात धान्य खरेदीचे आदेश करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारने त्वरीत त्याची अंमलबजावणी करत, गरजू लोकांपर्यंत हा माल पोहोचवण्याची योजना आखली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि गरीबांपर्यंत पोषणयुक्त धान्य पोहोवले जावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नोव्हेंबरपासून पुढील दोन महिन्यापर्यंत रेशनकार्ड धारकांना ज्वारीचे मुफ्त वितरण करण्यात येणार आहे.

राज्याच्या अन्न व नागरी प्रशासन विभागाकडून सर्व जिल्ह्यांना याविषयीचे आदेश देण्यात आले आहेत. हे वितरण सर्व जिल्ह्यात विशेषतः अंत्योदय आणि प्राथमिक कुटुंब योजनेच्या लाभार्थिंना करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

एक किलो ज्वारीचे होणार वितरण (Maharashtra Ration Card Holder)

या आदेशाप्रमाणे प्रत्येक लाभार्थीला प्रत्येकी एक किलो ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले गेले आहेत. दोन महिन्यासाठी पुरेल इतकी ज्वारी खरेदी कऱण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे ज्वारीसारख्या पिकांना चांगले मार्केट मिळावे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती मिळावी आणि पोषममुल्यांच्या दृष्टीनेही विचार व्हावा असे तिहेरी हेतू साध्य होणार आहेत. या योजनेमुळे ग्रामीण भागातील त्या जनतेला जास्त फायदा होणार आहे, जिथे ज्वारी आहारातील मुख्य घटक आहे.

12 जिल्ह्यात होणार वितरण (Maharashtra Ration Card Holder)

या योजनेअंतर्गत राज्यातील 12 जिल्ह्यांना प्रामुख्याने मोफत ज्वारी मिळणार आहे. यात पुणे शहर, पुणे जिल्हा, सातारा, सांगली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहमदनगर, लातूर, सोलापूर शहर आणि जिल्हा यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांसाठी एकुण 22,766 टन ज्वारीचा कोटा निश्चित केला आहे. आता नोव्हेंबरपासून पुढील दोन महिने ज्वारीचे मोफत वितरण होणार आहे.

RELATED NEWS

TET Exam Update, Big News : TET परीक्षेच्या शिक्षक संघटना आक्रमक, 5 डिसेंबरला काढला जाणार भव्य मोर्चा : Teachers Union Aggressive Against Tet Exam...

TET Exam Update : येत्या 5 नोव्हेंबरला रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई : 01/12/2025 टीईटी परीक्षा...

Actor Dharmendra Death, Sad News : शोलेचा ‘वीरू’ काळाच्या पडद्याआड, धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन : Veteran Actor Dharmendra Passes Away At...

Actor Dharmendra Death : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज सकाळी 9:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर विर्लेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबई : 24/11/2025 जेष्ठ...

Pankaja Munde PA Anant Garje Wife , Big News : पंकजा मुंडेंच्या पीए विरोधात अखेर गुन्हा दाख, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील तीनजणांवर गु्न्हा दाखल...

Pankaja Munde PA Anant Garje Wife : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी राहत्या घरात स्वतःला संपवले. आता गौरी यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments