Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Mukhyamantri Ladaki Bahin Yojana, Update Problems : तासन् तास लाडक्या बहिणी उन्हातान्हात...

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana, Update Problems : तासन् तास लाडक्या बहिणी उन्हातान्हात झाडाला फोन लटकवून उभ्या आहेत, काय आहे कारण ? : Maharashtra Nandurbar Tribal Women Climb Hills Tie Phone To Tree For Ladki bahin Yojana

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लोकप्रीय योजना म्हणजे, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना. सध्या या योजनेचा लाभ घेणाऱ्या आदिवासी भागातील महिला मात्र खुप समस्यांचा सामना करत आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना काय काय करावे लागत आहे ? जाणून घेऊ .

नंदुरबार : 13/10/2025

अर्धा अर्धा तास चालून गेल्यावर, कडक उन्हात ओटीपीसाठी थांबलेल्या महिलांची मोठी रांग, त्यांची नजर असते ती उंच झाडावर लटकवलेल्या आपल्या फोनकडे. एकदा सिग्नल येऊन, आपला ओटीपी मिळेल या आशेत या महिला इतरा त्रास सहन करत थांबलेल्या असतात. हे दृश्य आहे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील. येथे डिडिटल विकासाचे स्वप्न हे नेटवर्कच्या कमीमुळे पुर्ण होण्याची कोणतेही चिन्हं नाही. सध्या येथील शेकडो महिला ज्या लाडकी बहिण योजनेच्या  लाभार्थी आहेत, त्या सध्या शासनाने घातलेल्या केवायसी प्रक्रिया (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana)  पूर्ण करण्याची अट पूर्ण कऱण्याच्या प्रयत्नात आहेत.

धडगाव तालुक्यातील खारदे गावातील या महिला मोबाईलला सिग्नल मिळवण्यासाठी सुमारे 30 मिनीटांचा डोंगराळ बाग चढून जात आहेत. भामने ग्रामपंचायच समूह आणि खारदे खुर्द येथील साधारण 500 पेक्षा अधिक लाभार्थी महिला अशा उन्हात वाट पहात उभ्या असतात. त्यांना फक्त एकच आशा असते की, झाडावर उंच ठेवण्यात आलेल्या मोबाईलवर नेटवर्क मिळेल.

स्वयंसेवी संस्थांनी केली कॅम्पची सोय ( Mukhyamantri Ladaki Bahin Yojana )

हा भाग दोन राज्यांच्या सीमेवर येतो. मोबाईल नेटवर्क कधी गुजरात मधून तर कधी मध्य प्रदेश मधून येते. मोबाईल नेटवर्क ची शक्यता 5 टक्क्यांपेक्षापण येथे कमी आहे. उलगुलान फाऊंडेशन नामक एक गैरसरकारी संस्थेचे संस्थापक आहेत राकेश पवारा. त्यांनी सांगितले की, आम्ही येथे एक शिबिर घेतले आहे, येथे एकमात्र असे ठिकाण आहे जेथे मोबाईल नेटवर्क मिळते. मात्र तेही बऱ्याचदा मिळत नाही.

100 मधील 5 महिलांना ओटीपीची प्राप्ती ( Mukhyamantri Ladaki Bahin Yojana )

राज्य सरकारनेद्वारा ई-केवायसी अपडेट करण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या लाभार्थी भगिनींना त्याचा बराच त्रास होत आहे. वेबसाईट उघडायला, ओटीपी मिळायला मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. जे कागदपत्रं तपासण्यासाठी अपोलोड कऱण्यात येतात, ते सारखे टाईमआऊट होतात. कारण एकच येथील नेटवर्कचा प्रश्न. या साईटवर काम करून देणाऱ्या एका स्वयंसेवकाने सांगितले की, ओटीपी मिळवण्यासाठी 100 महिला प्रयत्न करत असतील तर त्यातील फक्त 5 महिलांना ओटीपी मिळतो. किंवा त्यांची साईट ओपन होते.

 काय म्हणाले अजित पवार ? (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी परत एकदा स्पष्ट केले आहे की, ई-केवायसीविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यांनी पुण्यात याविषयी बोलताना सांगितले की, केवळ ज्यांनी ई-केवायसी अपडेट केली आहेत, त्यांनाच पैसे मिळणार आहेत. मला माहित आहे की, या प्रक्रियेसाठी काही अडचणी आहेत. मात्र त्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. जर आवश्यकता वाटली तर, त्यासाठीचा कालावधी वाढवू शकतो. मात्र ई-केवायसी अपडेट करणे अनिवार्य आहे. सध्या याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर आहे.

ग्रामीण भागात याविषयीच्या अडचणी लक्षात घेऊन, हा निर्णय घेण्यात आला आहे. ओटीपी न मिळणे, इंटरनेटची खराब परिस्थीती किंवा घटस्फोटीत, मृत व्यक्तींच्याविषयीच्या काही केसेंसमध्ये काही समस्या आहेत. या सर्व समस्यांविषयी काय करावे याविषयीची कोणतीही स्पष्टता नाही.

टॉवर आहेत, पण नेटवर्क नाही

धडगांवचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळ यांनी या सर्व समस्या असल्याते मान्य केले आहे. त्यांनी सांगितले की, येथे मोबाईल टॉवर चार-पाच महिने आधी लागले आहेत, मात्र नेटवर्क, कनेक्टिव्हिटी अजूनही चांगली नाही. आम्ही कॉमन सर्व्ह्रीस सेंटर आणि आधार ऑपरेटर यांच्या मार्फत महिलांना मदत करत आहोत.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा झालेली आहे. मात्र लाभार्थ्यांना दोन महिन्याच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करायची आहे. ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर त्यांनी या प्रक्रियेची आठवण करून दिली आहे. त्यांच्या येथील पोस्टवर केलेल्या लोकांच्या कमेंटवरून समस्यांची तिव्रता लक्षात येईल.

RELATED NEWS

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against...

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत आणि इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर मोर्चा...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Parliament Winter Session, Big News 2025 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गोंधळ, विरोधकांकडून ‘व्होट चोर गद्दी छोड’चा नारा : Chaos Continues In Parliament...

Parliament Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान दुसऱ्या दिवशीही गोंधळ झाला. चर्चेदरम्यान एसआयआर हा शब्द टाळून "निवडणूक सुधारणा" किंवा इतर नावाने हा विषय कामकाजात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments