Saturday, June 27, 2026
Home पुणे Vaishanavi Hagwane Case Update : R.R. Kavedia As a public Prosecutor :...

Vaishanavi Hagwane Case Update : R.R. Kavedia As a public Prosecutor : वैष्णवी हगवणे केसमध्ये आर.आर. कावेडियांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, आरोपी निलेश चव्हाणची संपत्ती होऊ शकते जप्त .

 Vaishanavi Hagwane Case Update  : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दोन मोठ्या अपडेट आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या केससाठी आता सरकारी वकिलांची नियुक्ती झाली आहे.  फरार ओरापी निलेश चव्हाण याची संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड पोलीसांनी त्यांच्या विरोधात स्थायी वॉरंट काढले आहे.

पुणे : 2025-05-29

राज्यभर सध्या चर्चा आहे ती वैष्णवी हगवणे  (Vaishanavi Hagwane ) हिच्या हुंडाबळीची. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या केसने सुन्न केले आहे. अशा या गाजणाऱ्या केस मध्ये दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने वकिल म्हणून आर.आर. कावेडिया यांची नियुक्ती केली आहे. तसेच फरार आरोपी निलेश चव्हाण याची संपत्ती जप्त होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड पोलीसांनी त्याच्या विरोधात स्टँडींग वॉरंट काढले आहे. न्यायालयाने तसा कडक आदेश दिला आहे. 

कारण पोलीसांच्या अथक प्रयत्नांनंतरही निलेश चव्हाण सापडलेला नाही. पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले की, आरोपी निलेश चव्हाण बराच काळपासून फरार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या विरोधात स्टँंडिंग वॉरंट काढले आहे. या आदेशानुसार तसे जाहीर करून लवकरच जप्ती होणार आहे. 

स्टँंडींग वॉरंट म्हणजे काय ? 

जर कोणता आरोपी मुद्दाम आपली ओळख लपवतो आणि फरार असतो. ज्यामुळे त्याला न्यायालयात हजर करणे अवघड होते. अशावेळी न्यायालय स्टँडींग वॉरंट काढते. असे वॉरंट काढल्यानंतर पोलीस अशा आरोपीचे घर आणि संपत्तीची झडती घेतात. संपत्ती सार्वजनिक म्हणून घोषीत केली जाते. जर आरोपी तरीही न्यायालयात हजर झाला नाही, तर त्याची अचल संपत्ती जसे की घर, जमीन आणि चल संंपत्ती जसे की वाहन, महागड्या वस्तू आदींवर जप्तीची कारवाई केली जाते. 

फरार आरोपी निलेश चव्हाणची संपत्ती होणार जप्त ? 

सध्या आरोपी निलेश चव्हाण फरार आहे. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात तो सह-आरोपी आहे. म्हणून पोलीसांनी न्यायालयात स्थायी वॉरंट साठी अर्ज केला होता. जो मंजूर झाला आहे. आता पोलीस कारवाई करत संपत्तीची यादी तयार करतील, त्यानंतर जप्तीची कारवाई पूर्ण केली जाईल. यामुळे चव्हाण वर कायद्याचा दबाव वाढेल. आणि तो लवकर न्यायालयासमोर येईल. 

आर.आर. कावेडिया  (R.R. Kavedia ) असणार सरकारी वकिल 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील दुसरी मोठी घडामोड आहे ती सरकारी वकिल नियुक्तीची. हे प्रकरण दिवसेंदिवस संवेदनशील होत आहे. त्यासाठी आऱोपींना कडर शासन होण्याची मागणी होत आहे. त्यासाठी पिडीतेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकिलांची नियुक्ती केली गेली आहे. आर.आर. कावेडिया (R.R. Kavedia) यांची सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. यासाठी कस्पटे कुटुंबियांनी सरकारचे आभार मानले आहेत. 

गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आदेश 

कस्पटे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती की, आम्हाला एक चांगला वकील पाहिजे. जो या संवेदनशील केसला समजून घेईल. सक्षणपणे आमची बाजू मांडून आरोपींना कडक शिक्षा मिळवून देईल. त्यांच्या या मागणीची पूर्तता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आर.आर. कावेडीया  यांची नियुक्ती केली गेली आहे. कावेडिया हे वरिष्ठ वकिल आहेत. ज्यांनी आत्तापर्यंत अनेक गंभीर आणि संवेदनशील घटनांमध्ये यशस्वीरित्या बाजू मांडून न्याय मिळवून दिला आहे. ज्यामुळे आता वैष्णवी हगवणेची (Vaishanavi Hagwane ) केस सक्षमपणे हाताळली जाईल असा विश्वास आहे. 

 

RELATED NEWS

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments