INDIA Win Women World Cup 2025 , Good News : ‘चक दे इंडिया’ भारतीय महिला क्रिकेटर्सने रचला इतिहास, दक्षिण अफ्रिकेला केले पराभूत : Ind Vs Sa Afr Final Match Indian Women Win Odi World Cup !

India Win Women World Cup
Spread the love

INDIA Win Women World Cup : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण अफ्रिका महिला संघाचा पराभव करून आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे जेतेपद जिंकले. हे भारताचे पहिलेच जेतेपद ठरले. 

मुंबई : 03/11/2025

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला संघ यांच्यात नवी मुंबईतील डॉ.डी.वाय. पाटील स्पोर्टस अकादमी येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिका संघाला पराभूत करत विश्वचषक जेतेपद जिंकले आहे. या जेतेपदासह भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे.

नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेसमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण अफ्रिकेचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वबाद 246 धावांपर्यंतच पोहोचू शकला. त्यामुळे भारताने सामना 52 धावांनी जिंकला आणि ऐतिहासिक असे जेतेपद आपल्या नावे केले. भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक 5 विकेटस घेतल्या. 

भारताने दिले 299 धावांचे आवाहन  (INDIA Win Women World Cup)

भारतीय संघाने दिलेल्या 299 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दक्षिण अफ्रिका संघाने दमदार सुरूवात केली होती. कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिटस या सलामीवीर जोडीने पहिल्या विकेटससाठी ५१ धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर ताजमिन ब्रिटस 23 धावा करून बाद झाली. अमनजोर कौरने धावबाद केले. त्यानंतर मैदानात आलेली ॲनेके बॉश हिला शुन्यावर बाद व्हावे लागले. तिला श्री चरणीने बाद केले. सुन लुल आणि लॉरा वोल्वार्ड यांनी संघाला सावरले पण सुन लुस ला शेफाली वर्माने बाद केले.

त्यानंतर मरिझान कॅप 4 धावा, सिनालो जाफ्ता 16 धावा, अनेकी डेकर्सन 35 धावा करून बाद झाली. या दरम्यान कर्णधार वोल्वार्डने एक बाजु सांभाळून धरली आणि शतक झळकवले. परंतु ती 101 धावा करून दिप्ती कडून बाद झाली. त्यानंतर ट्रायॉन 9, नादिन डी क्लर्क 18, अयाबोंगा खाका 1 धाव घेऊन बाद झाल्या. तर नॉनकुलुलेको म्लाबा 0 धावावर नाबाद राहिली. भारताकडून दिप्ती शर्माने 9.3 ओव्हरमध्ये 39 धावा देत सर्वाधिक 5 विकेटस घेतल्या. तर शेफाली वर्माने 2 विकेटस घेतल्या आणि श्री चरणीने एक विकेट घेतली. 

भारताचा विजेता संघ (INDIA Win Women World Cup)

शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, (कर्णधार ), दिप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक) अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती  गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकुर. 

दक्षिण अफ्रिका संघ(INDIA Win Women World Cup)

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार ), ताजमिन ब्रिटस, अनेके बॉश, सुने लुस, मारझिन कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टिरक्षक ), अनेरी डेकर्सन, क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा. 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *