Electricity Rate Cutting, Big News, For Consumers Who Uses Below 100 Units Electricity : वीज बिलासंबंधी आता नो टेन्शन, 100 युनिट पर्यंतच्या वीजबीलासंदर्भात महत्त्वाचा निर्णय, फडणवीस सरकारचा सामान्यांना दिलासा .

Electricity Rate Cutting
Spread the love

Electricity Rate Cutting : राज्यातील जनतेला वीज बीला संदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे. वीज दर कपातीचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. 100 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. 

मुंबई : 17/07/2025 

राज्य सरकारने पावसाठी अधिवेशनात वीज बिला संदर्भात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जनतेला बराच दिलासा मिळणार आहे. महागाई वाढलेली असताना, वीज बिलातील कपात सर्वसामान्यांच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी फायद्याची ठरणार आहे. महायुतीसरकारने घेतलेला निर्णय आपण जाणून घेऊ. 

वीज बिला संदर्भातील निर्णय  (Electricity Rate Cutting )

100 युनिटच्या आतील वीज ग्राहकांना 26 टक्के शुल्क कपातीचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाठी अधिवेशनात बुधवारी याविषयीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना याविषयीची माहिती दिली. ग्राहकांची सुनावणी न घेता काही निर्णय का घेण्यात येत आहे, असा आमदार पाटील यांचा सूर होता. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. एमआरसीने चुकीचे आदेश दिल्याचे आणि त्यात दुरूस्तीची संधी असल्याचे म्हणणे सतेज पाटील यांनी सभागृहात मांडले. 

राज्यातील 70 टक्के ग्राहकांचा वीज वापर हा 100 युनिटपेक्षा कमी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या 70 टक्के ग्राहकांना 26 टक्के टेरिफ रिडक्शन, शुल्क कपात लागू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. त्याच्या पुढील कुठल्याच श्रेणीत वाढ नाही. वीज ग्राहकांच्या सर्व श्रेणीत शुल्क कपात केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वीज बिल आकारण्यातील त्रुटींवर मुख्यमंत्र्यांनी बोट ठेवले. 90 हजार कोटींची आकडेमोड दुहेरी होत असल्याचे सरकारने लक्षात आणून दिले.

एकीकडे घरगुती ग्राहकांना वीज सवलतीचा फायदा नाही तर दुसऱीकडे जालन्यातील एका स्टिल कंपनीला 200 कोटींचा फायदा सवलतीतून मिळत असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यानंतर MERC ने प्रकरण दाखल करून घेतले. नंतर त्रुटीत दुरूस्ती करण्यात आली. राज्यातील सर्व फीडरवर स्मार्ट मीटर बसले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस कृषी वीज पुरवठ्यात नेमका कुठे किती तोटा होत आहे, याची आकडेवारी समोर येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

महावितरणाचे राज्यात एकुण 2 कोटी 80 लाख ग्राहक आहेत. यामध्ये ठाणे, भांडूप, नवी मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्राचा समावेश आहे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी औद्यागिक ग्राहकांना वीज सवलत देण्यात येते.(Electricity Rate Cutting) शेतकऱ्यांना सवलत देण्यात येते. अशा शेतकऱ्यांसाठी सोलर उर्जेता पर्याय समोर आल्याने त्यांचा वीज वापराचा बोजा कमी होणार आहे. तर त्यांना अचानक वीज गेली तरी पिकांना पाणी देण्यासाठी ताटकळत थांबावे लागणार नाही. राज्यातील अनेक घरांवर सुद्धा सौर उर्जा प्रकल्पातंर्गत सोलर पॅनल बसवण्याचे प्रमाण वाढले आहे. 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *